शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
2
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
3
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
4
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
5
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
6
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
7
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
8
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
9
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
10
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
11
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
12
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
13
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
14
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
15
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
16
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
17
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
18
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
19
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
20
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...

सैलानी दर्गा येथे भाविकांची वर्दळ वाढली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2018 00:45 IST

पिंपळगाव सैलानी : सैलानी बाबांच्या यात्रेला होळीपासून सुरुवात झाली असून, सैलानी बाबांच्या दर्गावर गलफ फुलांची चादर चढविण्यासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली असून, मोठ्या श्रद्धेने भाविक सैलानी बाबांच्या समाधीचे दर्शन घेत आहेत.

ठळक मुद्देगलफ चढविण्यासाठी गर्दी विविध क्षेत्रातील मान्यवरांची भेट

लोकमत न्यूज नेटवर्कपिंपळगाव सैलानी : सैलानी बाबांच्या यात्रेला होळीपासून सुरुवात झाली असून, सैलानी बाबांच्या दर्गावर गलफ फुलांची चादर चढविण्यासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली असून, मोठ्या श्रद्धेने भाविक सैलानी बाबांच्या समाधीचे दर्शन घेत आहेत.सैलानी बाबांच्या यात्रेत सैलानी बाबांना मनोरुग्ण चांगले होण्यासाठी  नवस करीत असतात व तो नवस फेडल्यास मनोरुग्ण चांगले होतात, अशी भावना भाविकांची आहे. त्यामुळे यात्रेत गलफ नारळ, फुले चादर यांची प्रचंड प्रमाणात विक्री होत असते. यासाठी भाविकांच्या रांगाच रांगा दिसून येत आहे. तर सैलानी दर्गा परिसरासह गवळी बाबा, झिरा, वाघजाई, जांभळीवाले बाबा, महादेव मंदिर या ठिकाणी भाविकांची दर्शनासाठी चांगलीच गर्दी असते.  या यात्रेसाठी बुलडाणा जिल्ह्यासह परिसरातील भाविक तसेच राज्याबाहेरील भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती आहे. यासाठी प्रशासनाने विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. 

भाविकांना सुविधांचा अभावसर्व धर्माचे श्रद्धास्थान असलेल्या सैलानी बाबांच्या यात्रेला भारताच्या कानाकोपºयातून भाविक प्रशासनाकडून त्यांना कोणत्याच सुविधा मिळत नाही. याकडे संबंधित विभागाने लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे. सैलानी बाबांच्या यात्रेमध्ये दिवसेंदिवस भाविकांची वाढ होत आहे; परंतु या ठिकाणी सुविधांचा अभाव आहे. या ठिकाणी कायमस्वरूपी आरोग्य सुविधा, स्वच्छतागृह, स्नानगृह, रस्ते, भाविकांना राहण्यासाठी भक्त निवास, पिण्यासाठी कायमस्वरूपी पाणी व्यवस्था या सुविधा अद्याप येथे पुरविल्या जात नाही. त्यामुळे सैलानी संस्थानचा विकास होताना दिसत नाही. आंध्र प्रदेश, कर्नाटक, हैदराबाद, मध्य प्रदेश, तामिळनाडू, नेपाळ आदी राज्यांतून भाविक सैलानी बाबांच्या दर्शनासाठी मोठ्या श्रद्धेने येथे येतात; परंतु सुविधांअभावी भाविकांमध्ये नाराजी आहे. प्रशासनाने या तीर्थक्षेत्रासाठी ठोस पावले उचलून या तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी हातभार लावण्याची आवश्यकता आहे.

आ. राहुल बोंद्रे यांनी केली यात्रेची पाहणीसैलानी बाबांच्या यात्रेमध्ये चिखली विधानसभा मतदारसंघाचे आमदार राहुल बोंद्रे यांनी मुजावर व व्यापारी, करमणूक केंद्राचे मालक यांची भेट घेऊन यात्रेसंबंधी चर्चा केली व सैलानी बाबांच्या दर्गावर गलफ व फुलांची चादर डोक्यावर कटोरा घेऊन चादर चढविली व समाधीचे दर्शन घेतले. त्यांच्यासोबत हाजी हाशम मुजावर, पं.स. सदस्य शे.चांद मुजावर, सरपंच प्रदीप गायकवाड, शेख बबलू, शे. नजीर मुजावर, शे. रफिक मुजावर उपस्थित होते. याशिवाय सैलानी दर्गा येथे विविध क्षेत्रातील मान्यवर येत आहेत. या यात्रेत भाविकांची वाढलेली गर्दी पाहता पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला असून, आरोग्य विभागातर्फे विविध सुविधा पुरविण्यात येत आहेत. 

टॅग्स :buldhanaबुलडाणाRahul Bondreराहुल बोंद्रे