सुनील भगवान झोरे रा़ अमृतनगर देऊळगाव राजा यांनी देऊळगाव राजा पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांची पत्नी रेखा, लहान भाऊ समाधान झोरे व आई कांताबाई भगवान झोरे, वडील भगवान झोरे यांच्यासह एकत्रित राहतात़ त्यांचे वडील भगवान झोरे हे काही दिवसापूर्वी कोरोना पाॅझिटिव्ह होते़ ते उपचार करून सात जूनला घरी आले असता फिर्यादीचा लहान भाऊ समाधान झोरे मध्यरात्री दरम्यान दारू पिऊन घरी आला आणि शिवीगाळ करत वाद सुरू केला़ तसेच फिर्यादी सुनील झाेरे यांना घरातील स्टीलच्या बकेटने आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केली़ यामध्ये सुनील झाेरे यांच्या डोळ्यावर गंभीर दुखापत झाली़ याप्रकरणी समाधान भगवान झोरे यांच्याविरुद्ध देऊळगाव राजा पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे़ पुढील तपास पोलीस नाईक सुनील वाघ करीत आहे़
क्षुल्लक कारणावरून सख्ख्या भावाला केली मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:42 IST