बुलडाणा, दि. २७- सैलानी बाबा ट्रस्टचे अध्यक्ष शेख समद शेख चाँद यांनी सैलानी बाबांच्या दग्र्यावर वृत्त संकलनासाठी गेलेल्या पत्रकाराला शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना २१ मार्चला दुपारी घडली. याप्रकरणी रायपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खामगाव तालुक्यातील पिंपळगाव राजा येथील मोहंमद हसन अब्दुल हे २१ मार्च रोजी सैलानी बाबांच्या दग्र्यावर वृत्त संकलनासाठी गेले होते. सैलानी बाबा अस्थायी समितीचे अध्यक्ष शेख समद शेख चाँद यांनी त्यांच्याशी अरेरावी करून शिवीगाळ केली. यासंदर्भात मोहंमद हसन यांनी रायपूर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. त्यानुसार पोलिसांनी शेख समद यांच्याविरुद्ध भादंवि कलम ५0४, ५0६ अन्वये अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली आहे.
सैलानी बाबा ट्रस्टच्या अध्यक्षांवर गुन्हा दाखल
By admin | Updated: March 28, 2017 01:35 IST