खामगाव : सावत्र भाचीचे लैंगिक शोषण केल्याचा प्रकार कुमारिका गर्भवती राहिल्याने उघडकीस आला. याप्रकरणी पिंपळगाव राजा पोलिसांनी शनिवारी पीडितेच्या सावत्र मामाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तालुक्यातील हिवरा बु. येथे राहणार्या १५ वर्षीय कुमारिकेचे तिच्या सावत्र मामाने लैंगिक शोषण केले. दरम्यान, कुमारिका गर्भवती राहिल्याने हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी पीडित कुमारिकेने शनिवारी पिंपळगाव राजा पोलीस स्टेशनला फिर्याद दिली. या फिर्यादीवरुन पोलिसांनी गोपाल किसन दांडगे (वय २९) याचेविरुद्ध कलम ३७६ (२) (एन) ५0६ भांदविनुसार गुन्हा दाखल केला आहे. तपास ठाणेदार अहिरकर करीत आहेत.
सावत्र भाचीचे लैंगिक शोषण; गुन्हा दाखल
By admin | Updated: May 8, 2017 00:40 IST