शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी युद्ध सोडवण्यात तज्ज्ञ..." पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमा वादावर ट्रम्प यांचं भाष्य!
2
अभ्यासाला लागा! दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, असं आहे वेळापत्रक 
3
राज्यासमोर मोठं संकट! जगभरात थैमान घालणाऱ्या आजाराचा पहिला रुग्ण सापडल्याने खळबळ
4
SA W vs BAN W : निर्णायक षटकात अख्तरची धुलाई; रंगतदार सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं मारली बाजी
5
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती एकत्रित लढणार!
6
४८ तासात 'सोनेरी सफर'च्या दोन घटना उघड , रेल्वेच्या तपास यंत्रणा खडबडून जाग्या 
7
डिस्काउंटचा धमाका! १० हजारांपेक्षा कमी किंमतीत मिळतायेत 'हे' जबरदस्त फोन
8
६००० रुपयांचा बोनस आणि...; एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी तिप्पट गोड!
9
Video: आधी कानाखाली मारल्या, नंतर धरली मान; मॅच सुरू असतानाच स्टेडियमध्ये 'बाई, काय हा प्रकार'
10
ठाणे-वसईकरांचे हाल! घोडबंदर मार्गावर चार-चार तास वाहतूक कोंडी
11
पाकिस्तानात शरणार्थी, मशिदीतून शिक्षणाची सुरुवात; तालिबानी परराष्ट्रमंत्री मुत्ताकी किती शिक्षित आहेत? जाणून घ्या...
12
ईतवारी एक्सप्रेसमध्ये सापडले सोन्याचे घबाड, एकाला अटक; साडेतीन कोटींचे सोने जप्त!
13
उल्हासनगर भाजपाकडून पाणी टंचाई विरोधात मोर्चा; योगेश म्हात्रे यांच्याकडून आत्महत्येचा प्रश्न 
14
"शेतकरी पॅकेज, कर्जमाफी, लाडकी बहीण या मुद्द्यांवर  महायुती सरकारकडून जनतेची फसवणूक’’, रमेश चेन्नीथला यांचा आरोप
15
"डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल मिळावा म्हणून आम्ही..."; इस्रायलचे PM बेंजामिन नेतन्याहूंनी मानले ट्रम्प यांचे आभार
16
तेज प्रताप यादव यांनी २१ जागांवर उमेदवार उभे केले; स्वतः या जागेवरून निवडणूक लढवणार
17
अरे देवा हे काय, विद्यार्थ्यांच्या बॅगमध्येच कोयते-चॉपर! नाशिकमधील भाईगिरीचे 'फॅड' शाळेपर्यंत
18
मुंबईत ठाकरे बंधूंसोबत लढायचं की स्वतंत्रपणे? काँग्रेसच्या नेत्यांनी हायकमांडकडे केली अशी मागणी
19
सात दिवस उलटूनही IPS पूरन कुमार यांच्या मृतदेहाचे पोस्टमॉर्टम नाही; पत्नीने केली मोठी मागणी...
20
‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ योजना बंद झाल्याची चर्चा? शालेय शिक्षण विभागाने दिली अशी माहिती

रामजन्मभूमीसाठी शिर्ला नेमाने येथील कारसेवकाचे बलिदान!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2020 16:31 IST

शिर्ला नेमाने येथील विष्णूदास नेमाने यांचे बलिदान व्यर्थ जाणार नसल्याचे समाधान त्यांच्या कुंटुंबियांना आहे.

- अनिल गवईलोकमत न्यूज नेटवर्कखामगाव :  अयोध्येत प्रभु श्रीरामाचे ऐतिहासिक राम मंदिराच्या लढ्यात खामगाव तालुक्यातील तालुक्यातील ३५० च्यावर कारसेवक सहभागी झाले. यापैकी शिर्ला नेमाने येथील विष्णूदास नेमाने यांना अयोध्येतच मरण आले होते. आता राम मंदिराचे भूमिपूजन होत आहे. अयोध्येत राम मंदिर उभारल्या जाणार असल्याने, शिर्ला नेमाने येथील विष्णूदास नेमाने यांचे बलिदान व्यर्थ जाणार नसल्याचे समाधान त्यांच्या कुंटुंबियांना आहे.सुमारे २८ वर्षांपूर्वी अयोध्येतील विवादित ढाचा कारसेवकांच्या रॅलीने जमिनदोस्त केला. या रॅलीत देशभरातून दीड लाखाच्यावर कारसेवक सहभागी होते. यामध्ये  विदर्भातील सहा जणांना आपला प्राण गमवावा लागला होता. यामध्ये पश्चिम विदर्भातील विष्णुदास रामराव नेमाने (२८) यांचे नाव आघाडीवर होते. या घटनेनंतर शिर्ला नेमाने येथील अनेकांची गोपनिय चौकशीही करण्यात आली. विवादित ढाचा पाडण्यासाठी अयोध्येत गेलेले विष्णुदास नेमाने त्यावेळी अवघ्या २८ वर्षांचे होते. त्यांच्या मृत्यूमुळे कुटुंबियांवर मोठा आघात झाला होता.   आता विष्णुदास नेमाने यांच्या स्मृतीने त्यांचे कनिष्ठ बंधू प्रल्हाद नेमाने आणि  सविता टाले, कावेरी मोहोड या भगिनींच्या डोळ्यात अश्रृ तरळतात.

 शिर्ला नेमाने येथील ११ कारसेवक!राम मंदिराच्या जागेवरील विवादित ढाचा पाडण्यासाठी देशभरातून दीड लाखावर कारसेवक अयोध्येत ०६ डिसेंबर १९९२ साली रेल्वेने अयोध्येत गेले होते. यामध्ये शिर्ला नेमाने येथील विष्णुदास रामराव नेमाने, निळकंठराव देशमुख, देविदास चव्हाण, अनिल देशमुख,  भानुदास जाधव, हरिभाऊ काकड, श्रीकृष्ण खंडारे, नंदकिशोर जोशी, प्रमोद नेमाने, श्रीकृष्ण शिंदे, प्रल्हाद निंबाळकर यांचा समावेश होता. यात विवादित ढाच्याच्या ठिकाणीच विष्णुदास नेमाने मृत्युमुखी पडले होते.

 राम मंदिराच्या लढ्यात मोठे भाऊ सहभागी होते. आता त्याच ठिकाणी राम मंदिराचे भूमिपूजन होत असल्याचे समाधान आहे. गड आला पण सिंह गेल्याचे दु:ख आहे.- प्रल्हाद रामराव नेमाने(विष्णुदास नेमाने यांचे लहान बंधू)शिर्ला नेमाने ता. खामगाव.

 राम मंदिराच्या ऐतिहासिक लढ्यात खामगाव तालुक्यातून ३५० च्यावर कारसेवक सहभागी झाले होते. स्वत: या लढ्यात सहभागी होतो. मंदिराचे भूमिपूजन होणार असल्याने कारसेवकांच्या बलिदानाचे सार्थक होत आहेत.- बापू करंदीकरकारसेवक, खामगाव.

टॅग्स :khamgaonखामगावAyodhyaअयोध्याRam Mandirराम मंदिर