शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

विद्युत मीटरमध्ये छेडछाड करणारे रॅकेट सक्रीय;चौघांविरुद्ध गुन्हा दाखल !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2019 14:58 IST

नांदुरा : विद्युत मीटरमध्ये छेडछाड करून वीज बिल कमी करून देणारे रॅकेट नांदुरा शहरात सक्रिय झाले असल्याचे समोर आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनांदुरा : विद्युत मीटरमध्ये छेडछाड करून वीज बिल कमी करून देणारे रॅकेट नांदुरा शहरात सक्रिय झाले असल्याचे समोर आले आहे. त्याविरुद्ध वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी धडक कारवाई केल्याची घटना घडली आहे.शहरातील सिंधी कॉलनी भागातील वीज ग्राहकांच्या घरी २७ एप्रिल रोजी सकाळी नऊ वाजेदरम्यान वीज चोरीच्या उद्देशाने वीज मीटरमध्ये छेडछाड करताना चार जण वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांना आढळून आले. त्यामुळे त्या चौघांविरूध्द वीज चोरी तसेच धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नादुरुस्त असलेले मीटर बदलल्यानंतर दोनच दिवसांनी वीज चोरी करण्याच्या हेतूने मीटरशी छेडछाड करण्यात येत असल्याची माहिती मिळाली असता, नांदुरा शहर अभियंता ढोले, नांदुरा ग्रामीण अभियंता सोयासकर, वारिस्ट तंत्रज्ञ शे मंजूर, कंत्राटी कामगार गजानन मुरकर व उपकार्यकरी अभियंता नांदुरा उप विभाग यांनी पाळत ठेऊन २७ एप्रिल रोजी सकाळी ९ च्या सुमारास सिंधी कॉलनीत अज्ञात व्यक्तीला पकडण्याचा प्रयन्त केला. मात्र तो मीटरचे झाकण काढून व इन्कमरचे वायर काढून पळून गेला. परंतु त्याचा फोटो काढण्यात कर्मचाºयांना यश आले. यानंतर वीज ग्राहकास त्या व्यक्तीचे नाव विचारले असता, टोलवा टोलवीचे उत्तर देण्यात आले. दरम्यान कार्यकारी अभियंता मलकापूर यांच्या मार्गदर्शनात राजू आयलदास लाखांनी, नैवतमदास आयलादास लाखांनी, गजानन शेलकर वय आणखी एक अज्ञात यांच्या विरोधात विद्युत कायदा २००३ चे कलम १३८ नुसार व इतर कलमाखाली नांदुरा पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला.या प्रकरणात सहाय्यक अभियंता ज्ञानेश्वर ढोले यांनी तक्रार दिली. विशेष म्हणजे यामधील अज्ञात आरोपीने वीजवितरण कंपनीचे वरिष्ठ तंत्रज्ञ शे मंजूर यांना जीवे मारण्याची धमकी दिली. तर गजानन शेलकर यांने कंत्राटी कामगार गजानन मुरकर यांना कोणत्याही अधिकाºयाला न सांगण्या बाबत दमदाटी करून निघून गेला होता. (प्रतिनिधी)

टॅग्स :buldhanaबुलडाणाNanduraनांदूराmahavitaranमहावितरण