शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

भरधाव मालवाहू मिनीट्रकने चिरडले, एका शिक्षकाचा जागीच मृत्यू

By अनिल गवई | Updated: July 30, 2024 12:36 IST

एक शिक्षक गंभीर जखमी: खामगाव-पिंपळगाव राजा रस्त्यावरील घटना

खामगाव: भरधाव मालवाहू मिनीट्रकने चिरडल्याने एक शिक्षक जागीच ठार झाला. तर त्यांचा सहकारी शिक्षक गंभीर जखमी झाला. ही घटना मंगळवारी सकाळी साडेदहा वाजता दरम्यान खामगाव-पिंपळगाव राजा रस्त्यावर घडली.

प्राप्त माहितीनुसार, खामगाव तालुक्यातील पिंपळगाव राजा येथील जिल्हा परिषद उर्दू शाळेवर कार्यरत असलेले दोन शिक्षक सकाळी शाळेवर जाण्यासाठी एमएच २८ एएच २०३४ या दुचाकीने निघाले. दरम्यान, विरूध्द दिशेने येणाऱ्या एमएच १७ टी ४६३८ या क्रमांकाच्या भरधाव मिनीट्रकने खामगाव-पिंपळगाव राजा रस्त्यावरील एका स्टाईलच्या दुकानासमोर दुचाकीला समोरा समोर जबर धडक दिली. यात चिरडल्या गेल्याने इरफान शहा लुकमान शहा नामक शिक्षकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

तर त्यांचे सहकारी शिक्षक रफीउद्दीन शहाउद्दीन गंभीर जखमी झाले. या घटनेची माहिती मिळताच शिवाजी नगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. जखमी शिक्षकाला खामगाव येथील खासगी रूग्णालयात हलविण्यात आले. तर मृतकाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी खामगाव येथील उपजिल्हा सामान्य रूग्णालयात हलविण्यात आला. या घटनेमुळे मृतकाच्या परिवारावर शोककळा पसरली आहे. घटनेची माहिती मिळताच मृतकाचे नातेवाईक मोठ्या संख्येने खामगाव येथील उपजिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल झाले.