शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

भरधाव कार खड्ड्यात उलटली, 2 जण ठार; बुलढाणा-औरंगाबाद रस्त्यावरील जांबजवळील घटना

By संदीप वानखेडे | Updated: October 31, 2022 17:02 IST

मराठवाड्यातील जाफराबाद तालुक्यातील चापनेर येथे दिवाळी सण साजरा करून आपल्या गावाकडे कारने जात होते. दरम्यान, औरंगाबाद रस्त्यावरील जांब ते म्हसाला गावाच्या दरम्यान चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले.

धाड (बुलढाणा) - चालकाचे नियंत्रण सुटल्याने भरधाव कार रस्त्यावरील कठड्यावर आदळून खड्ड्यात उलटली. यामध्ये महिलेसह तिचा दीर ठार झाला, तर दोन मुले आणि पती जखमी झाले आहेत. ही घटना बुलढाणा- औरंगाबाद रस्त्यावरील जांबजवळ ३० ऑक्टोबर रोजी रात्री घडली. सुनीता संतोष पन्हाळे (वय २६) व आकाश प्रकाश पन्हाळे (वय २४) अशी मृतांची नाव आहेत.

मराठवाड्यातील जाफराबाद तालुक्यातील चापनेर येथे दिवाळी सण साजरा करून आपल्या गावाकडे कारने जात होते. दरम्यान, औरंगाबाद रस्त्यावरील जांब ते म्हसाला गावाच्या दरम्यान चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे कार रस्त्यावर असलेल्या कठड्यावर आदळली. तेथून रस्त्याच्या बाजूला असलेल्या खड्ड्यात कार उलटली. 

अपघातात सुनीता पन्हाळे यांचा जागीच मृत्यू झाला तर त्यांचे पती संतोष पन्हाळे, दीर आकाश पन्हाळे, दोन मुले गंभीर जखमी झाली. घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळावर धाव घेऊन जखमींना उपचारासाठी हलवले. उपचारादरम्यान आकाश पन्हाळे यांचा मृत्यू झाला. तसेच इतर जखमींवर उपचार सुरू आहेत. या घटनेची माहिती अद्यापही स्थानिक पोलिसांत नसल्याचे समजते. 

टॅग्स :buldhanaबुलडाणा