डोणगाव (जि. बुलडाणा): डोणगाव येथून गेलेल्या महामार्गावरील वाशिम-बुलडाणा जिल्ह्याच्या हद्दीवर एका धावत्या कारला अचानक आग लागल्याची घटना २१ एप्रिल रोजी दुपारी २.३0 वाजताच्या दरम्यान घडली. यामध्ये जीवितहानी झाली नाही. लोणार तालुक्यातील बिबी येथील गजानन रामभाऊ भारती हे सहकुटुंब बिबीवरून यवतमाळला एम.एच.२८ व्ही.७३0८ क्रमांकाच्या कारने लग्नाला जात होते. दरम्यान, सदर कार डोणगावपासून काही अंतरावर गेली असता गाडीने इंजनजवळ पेट घेतल्याचे गजानन भारती यांच्या लक्षात आले. तेव्हा त्यांनी गाडीत असलेले मीनाक्षी भारती, सागर भारती, सायली भारती, प्रशांत अवसरमोल यांना तातडीने गाडीच्या खाली उतरण्यास सांगितले. सर्वजण गाडीच्या खाली उतरताच गाडीचा स्फोट झाला व पूर्ण गाडी जळून खाक झाली. यात कुठलीही जीवित हानी झाली नाही.
धावत्या कारला आग
By admin | Updated: April 22, 2016 02:25 IST