शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
4
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
7
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
8
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
9
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
10
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
11
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
12
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
13
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
14
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
15
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
16
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
17
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
18
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
19
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
20
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

ऐकावे ते नवलच...खामगावात पिवळ्या बेंडकांच्या पावसाची अफवा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 11:40 IST

Rumors of yellow frogs rain in Khamgaon: खामगाव आणि परिसरातील तलाव आणि पाणवठ्यावर आढळून येत असलेले बेडूक विषारी असल्याची अफवा सर्वत्र पसरली आहे.

- अनिल गवईलोकमत न्यूज नेटवर्कखामगाव:  मान्सूनपूर्व पावसादरम्यान पिवळ्या बेडूकांचा पाऊस पडल्याची अफवा परिसरात वाºयासारखी पसरली असून परिसरातील तलाव आणि पाणवठ्यांवर गडद पिवळ्या रंगाचे बेडूक अचानक आढळून येत आहे. त्यामुळे शेतकºयांसह सामान्य नागरिकही भयभित झाले आहेत.खामगाव आणि परिसरातील तलाव आणि पाणवठ्यावर आढळून येत असलेले बेडूक विषारी असल्याची अफवा सर्वत्र पसरली आहे. त्याचप्रमाणे अशा प्रकारचे बेडूक आढळल्यास अपशकून घडत असल्याची अंधश्रध्दा परिसरात आहे. त्यामुळे या बेडकांबाबत विविध शंका आणि कुशंका व्यक्त होत आहेत.

 अपशकून घडणार असल्याची अफवा!- कोरोना संकटाचे सावट गडद असतानाच खामगाव आणि परिसरात गडद पिवळ्या रंगाचे बेडूक आढळून आले आहेत. हे बेडूक विषारी आहेत. त्याचप्रमाणे अशाप्रकारचे बेडूक आढळून आल्यास अघटीत घडते. अशी अंधश्रध्दा ग्रामीण भागात आहे. त्यामुळे गडद पिवळ्या रंगाचे बेडूक आढळून आलेल्या परिसरात अपशकून घडते, अशी चर्चा ग्रामीण भागात होत आहे.

 बेडकांचा पाऊस झाल्याची चर्चा-तलाव आणि पाणवठ्यांवर आढळून येणारे बेडूक मान्सूनपूर्व पावसातून पडल्याची जोरदार चर्चा ग्रामीण भागात होत आहे. पावसातून मासे पडू शकतात. तर बेडूक का नाही? असा प्रश्न ग्रामीण भागातील काही जुन्या जाणत्या नागरिकांनी उपस्थित करत, बेडकांच्या पावसाला दुजोरा दिला आहे. त्यामुळे खामगाव आणि परिसरात भीतीचे सावट पसरले आहे.

 खामगाव आणि परिसरात आढळून आलेले बेडून उष्मकालीन समाधीतून बाहेर आलेले नर बेडूक आहेत. मिलनोत्सूक असलेले हे बेडूक मादीला आकर्षित करण्याचा प्रयत्न करतात. पाऊस पडल्यानंतर समाधी अवस्थेतून बाहेर पडणारे हे बेडूक अजिबात विषारी नाहीत. पावसातून बेडूक पडत नाहीत.- यादव तरटे पाटीलपर्यावरण तज्ज्ञ, अमरावती.

 - बेडूक पावसातून पडत नाहीत. पावसातून बेडूक बाहेर पडत असल्याची अंधश्रध्दा आणि अफवाच आहे. त्यामुळे कुणीही घाबरून जाण्याचे काहीही कारण नाही. प्रजनन कालासाठी हे बाहेर पडले आहेत.- प्रताप मारोडेनिसर्ग तज्ज्ञ, संग्रामपूर.

 - निसर्गात आढळून येणारे सर्वच बेडूक हे विषारी नसतात. मात्र, पावसाळ्यात आढळून येणारे काही बेडूक विषारी असू शकतात. असा काही तज्ज्ञांचा दावा आहे. खामगाव आणि परिसरात हे बेडूक गत दोन-तीन दिवसांपासून आढळून येत आहेत.- संजय गुरवपक्षीमित्र तथा निसर्ग अभ्यासक, खामगाव.

टॅग्स :khamgaonखामगावRainपाऊस