शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

खासगी प्रवाशी वाहतूकीच्या विरोधात आरटीओची मोहिम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2020 15:38 IST

दोन दिवसात जिल्ह्यात तीन बसगाड्या ताब्यात घेण्यात आल्या आहेत.

- नीलेश जोशी लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: सुरक्षा मानकांना बगल देऊ होत असलेल्या खासगी प्रवाशी वाहतूक करणाऱ्या वाहनांविरोधात उप प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाने धडक मोहीम सुरू केली असून दोन दिवसात जिल्ह्यात तीन बसगाड्या ताब्यात घेण्यात आल्या आहेत. येत्या काळात ही मोहिम अधिक तेज करण्यात येणार असल्याचे सुत्रांनी स्पष्ट केले.प्रामुख्याने कारवाई करण्यात आलेल्या वाहनांमध्ये स्लीपर कोच बसगाड्यांचा समावेश आहे. या बसगाड्यांमध्ये संकटकाळी बाहेर पडण्याचा मार्ग बंद असणे, निकषानुसार वाहनांची लांबी, रुंदी नसणे, आपतकालीन दरवाज्याचे ठिकाण बदलणे, वाहनातील गँगवे निकषानुसार नसणे, अग्नीश्यामक यंत्र नसणे, वाहनातील वातानुकूलीत यंत्रणा सुस्थितीत नसणे तथा तक्रार पुस्तिकाही नसणे, वेग नियंत्रक यंत्र बसवलेले नसणे अशा कारणावरून ही कारवाई करण्यात येत आहे. गेल्या एक ते दीड महिन्यापासून अनुषगीक विषयान्वये ही तपासणी करण्यात येत आहे. प्रकरणी दोन दिवसात मेहकर येथे दोन तर खामगाव येथे जीजे-१४- झेड-३५७० या सुरत ते यवतमाळ या स्लीपर कोच वाहनावर कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई महसूल सुरक्षा पथकासमवेत उप प्रादेशिक परिवहन अधिकारी जयश्री दुतोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली मोटार वाहन निरीक्षक निशिकांत वैद्य, चालक भिकाजी मेढे आणि मोटार वाहन निरीक्षक भोपळे यांनी केली आहे.या वाहनांमध्ये आपत्कालीन दरवाजा उघडत नसणे, एक दरवाजा सामानाची कॅबीन बनवून बंद करणे, विना परवाना टपावरून सामानाची वाहतूक करणे तथा क्षमतेपेक्षा अधिक प्रवाशी वाहनात घेणे या कारणावरून ही कारवाई करण्यात आली आहे.आॅॅटो रिक्षाही रडारवरजिल्ह्यात परवानाधारक ५,०७५ अ‍ॅटो असून खासगी ९,८५१ अ‍ॅटो आहेत. या अ‍ॅटो रिक्षांवर ही आरटीओ नजर ठेवून असून येत्या काळात त्यांच्यावरही कारवाई होण्याचे संकेत आहे.बुलडाणा जिल्ह्याचा विचार करता चार लाख ६७ हजार ८३ एकुण वाहने असून दुचाकींचीही संख्या तीन लाख ६७ हजार ८६७ च्या घरात गेली आहे.फिटनेस प्रमाणपत्र रद्द करणारपरराज्यातून महाराष्ट्रात प्रवासी वाहतूक करणाºया या खासगी स्लीपर कोच क्षमतेपेक्षा अधिक प्रवाशी वाहतूक करत असून सुरक्षा मानकांना बगल देत आहे.सोबतच या वाहनांच्या तंदुरुस्तीचाही प्रश्न गंभीर बनत असल्याचे सुत्रांचे म्हणणे आहे. त्या पार्श्वभूमीवर एका वाहनास नऊ हजार रुपये दंड करण्यात आला असून तीन वाहनांचे योग्यता प्रमाणपत्रच रद्द करण्यात येणार असल्याचे संकेत सुत्रांनी दिले आहेत.१८ स्लीपर कोचवर नजरबुलडाणा जिल्ह्यातून १८ स्लीपर कोच बसेसला परवाना देण्यात आलेला आहे. या वाहनावरही आरटीओची नजर असून परराज्यातून महाराष्ट्रात येणाºया व क्षमतेपेक्षा अधिक प्रवाशी वाहतूक करणाºया खासगी प्रवासी बसेसवरही ही पथके नजर ठेवून आहेत.या व्यतिरिक्त ‘पाईव्ह प्लस वन’,‘नाईन प्लस वन’,‘सीक्स प्लस वन’ चा परवाना असलेल्या व खासगी वाहतूक करणाºया वाहनावरही सध्या या विभागाने ‘वॉच’ ठेवला आहे. जिल्ह्यात १,७६५ आणि ६५० ऐवढी या काळीपिवळी आणि मॅजिक वाहनांची संख्या आहे. येत्या काळात प्रवाशी सुरक्षेला बगल देणाºया या वाहनावर ही धडक कारवाई करण्यात येणार आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाRto officeआरटीओ ऑफीस