शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
2
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
3
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
4
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
5
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
6
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
7
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
8
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
9
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
10
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
11
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
12
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
13
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
14
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
15
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
16
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
17
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
18
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
19
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक
20
एकनाथ शिंदेंच्या त्रासाला कंटाळून नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये जाणार होते!; ठाकरे गटाचा दावा

निवास निश्चितीच्या फेऱ्यात अडकले आरटीईचे अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2019 14:08 IST

नकाशामध्ये घराचे निश्चित स्थान मिळत नसल्याने आरटीईचे अर्ज भरताना पालकांना अडचणी येत आहेत.

- ब्रम्हानंद जाधव लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: शिक्षण हक्क कायद्यानुसार दिल्या जाणाऱ्या २५ टक्के राखीव जागांसाठी जिल्ह्यातून आजपर्यंत २ हजार ९९८ अर्ज आले आहेत. अर्ज भरताना आपल्या स्वत: च्या घराचे स्थान दाखविण्यासाठी रहिवासी पुराव्यावरील पत्ता व शाळा आणि घराचे अक्षांश, रखांश याचा विचारही करावा लागतो. मात्र नकाशामध्ये घराचे निश्चित स्थान मिळत नसल्याने आरटीईचे अर्ज भरताना पालकांना अडचणी येत आहेत.२५ टक्के मोफत प्रवेशाचे आॅनलाइन अर्ज भरण्यास ५ मार्चपासून सुरूवात झाली आहे. यासाठी पालकांना विविध कागदपत्रांची जुळवा-जुळव करावी लागत आहे. तर अर्ज भरताना विविध किचकट बाबी पूर्ण कराव्या लागत आहेत. दरम्यान, पाल्यांचे आरटीई फॉर्म भरत असताना आपल्या स्वत: च्या घराचे स्थान निश्चित करताना रहिवासी पुराव्यावरील पत्ता पाहूनच नकाशात स्थान निश्चित करणे आवश्यक आहे. त्यासाठी गुगल नकाशावर राहत्या घराचे अचूक ठिकाण निवडून ‘लोकेशन बलून’ राहत्या घरावरच दर्शवावा लागतो. जोपर्यंत आपल्या निवासाच्या घरावर बलून (चिन्ह) दिसून येत नाही, तोपर्यंत अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण होऊ शकत नाही. सध्या अर्ज भरताना आपल्या राहत्या घराचे अचूक ठिकाण गुगल नकाशावर मिळून येत नाही. अर्ज भरताना घराचे व शाळेचे अंतरही महत्त्वाचे समजल्या जाते. परंतू अक्षांश व रेखांश शोधण्यासही अडचणी येत आहेत. ग्रामीण भागातील अनेक घरांचे निश्चित स्थान गुगल नकाशावर मिळत नाही. त्यामुळे अर्ज भरण्याची प्रक्रिया अर्धवटच राहत आहे. या व्यतिरिक्त सुद्धा काही अडचणी आॅनलाइन अर्ज भरताना येत असल्याने पालकांनी नाराजी व्यक्त केली आहे. आॅनलाईन अर्ज विहित मुदतीत न भरल्यास जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना प्रवेशास फटका बसण्याची स्थिती निर्माण झाली आहे.

जिल्ह्यातून तीन हजार अर्जजिल्ह्यात आरटीई अंतर्गत २५ टक्के मोफत प्रवेशासाठी २२० शाळा पात्र ठरविण्यात आल्या आहेत. तर २ हजार ९२९ जागा भरण्यात येणार आहेत. ५ मार्चपासून आजपर्यंत २ हजार ९९८ अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यामध्ये आॅनलाइन २ हजार ९९४ व मोबाईल अ‍ॅपद्वारे अवघे चार अर्ज आले आहेत.

टॅग्स :buldhanaबुलडाणाRight To Educationशिक्षण हक्क कायदा