शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

आरटीइ प्रवेश; शाळांमध्येच द्यावी लागणार कागदपत्रे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2020 11:59 IST

आरटीइ पोर्टलवर उपलब्ध असलेले अलॉटमेंट लेटरची प्रतही शाळांमध्ये द्यावी लागणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : बालकांचा सक्तीचा व शिक्षणाचा अधिकार अधिनियमांतर्गत खासगी शाळांमध्ये २५ टक्के जागांवर वंचित व दुर्बल घटकांतील बालकांना प्रवेश प्रक्रीया सुरू झाली असून त्यासाठी कागदपत्रांची पडताळणी शाळास्तरावरच केली जाणार आहे. सोबतच आरटीइ पोर्टलवर उपलब्ध असलेले अलॉटमेंट लेटरची प्रतही शाळांमध्ये द्यावी लागणार आहे. राखीव जागांवर प्रवेशासाठी तालुक्यातील ३३२ बालकांची निवड झाली आहे, तर ३०२ जणांची प्रतिक्षा यादी शिक्षण विभागाने तयार केली आहे.प्रवेशाच्या २५ टक्के जागा वंचीत व दुर्बल घटकातील बालकांसाठी राखीव ठेवण्याची तरतूद आहे. शासनाकडून संपूर्ण राज्यामध्ये दरवर्षी एकदाच आरटीई प्रवेशाची प्रक्रिया राबविण्यात येते. शैक्षणिक सत्र २०२०-२१ साठी आरटीई प्रक्रियेच्या लॉटरी पद्धतीने प्रवेश निश्चित झाल्यानंतर पालकांना याबाबतचा संदेश त्यांनी रजिस्टर केलेल्या मोबाईल नंबरवर पाठविला जात आहे. तथापि, काही तात्रिक अडणीमुळे पालकांना प्रवेशाबाबतचा संदेश न मिळाल्यास पालकांनी संकेतस्थळावर भेट दिल्यास सुद्धा प्रवेशाबाबतची स्थिती पाहता येते.आधीच्या प्रक्रीयेनुसार पालकांना पंचायत समिती स्तरावर पडताळणी समितीकडे कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर शाळेत प्रवेश दिला देण्याचे ठरले. त्यामध्ये आता बदल करण्यात आला आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांचा प्रवेश निश्चित झालेल्या शाळेतच कागदपत्रांची पडताळणी केली जाणार आहे. त्याबाबतचा संदेश पालकांना मोबाईलवर संदेश दिला जात आहे.पालकांना मेसेज न मिळाल्यास आरटीइ पोर्टलवर प्रवेशाची तारिख याठिकाणी अर्ज क्रमांक टाकून प्रवेश घेण्याचा दिनांक पाहता येतो. सोबतच प्रवेशासाठी लागणारे कागदपत्रे आरटीइ पोर्टलवरील अर्जाची स्थिती यावर क्लिक करून हमीपत्र व अलॉटमेंट लेटरची प्रत घ्यावी, ती शाळेत दिल्यानंतर तात्पुरता प्रवेश निश्चित होणार आहे.संबंधित शाळांनी प्रवेश दिलेल्या विद्यार्थ्यांची सर्व कागदपत्रे तालुकास्तरीय पडताळणी समितीकडे सादर करून तपासणी करून घ्यावी लागणार आहे. त्या समितीच्या मंजूरीनंतरच विद्यार्थ्यांचे प्रवेश अंतिम होणार आहेत. दरम्यान, अलॉटमेंट लेटरवर शाळांमध्ये प्रवेश मिळणार आहे.

तालुक्यातील २९ शाळांमध्ये होणार प्रवेशखामगाव तालुक्यातील २९ शाळांमध्ये ३३२ विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जात आहे. तर ३०२ विद्यार्थ्यांची प्रतिक्षा यादी आहे. निवड यादीतील प्रवेशासाठी अपात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांच्या जागेवर प्रतिक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे.

टॅग्स :Right To Educationशिक्षण हक्क कायदाkhamgaonखामगावEducation Sectorशिक्षण क्षेत्र