शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

‘आरटीओ’ च्या कारवाईत १.६८ कोटींची वसुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2020 11:51 IST

या वाहनधारकांकडून एक कोटी ६८ लाख ८० हजारांचा दंड वसुल करण्यात आला आहे.

- योगेश देऊळकार  लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : वाहतुक नियम मोडणाऱ्या वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येते. ‘आरटीओ’ च्या जाळ्यात ५७९ वाहने गेल्या वर्षभरात अडकली आहेत. जप्त केलेल्या वाहनांपैकी ८३ टक्के वाहनांची मुक्तता करण्यात आली आहे. या वाहनधारकांकडून एक कोटी ६८ लाख ८० हजारांचा दंड वसुल करण्यात आला आहे.अपघाताचे प्रमाण टाळण्यासाठी आणि वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी वाहतुकीचे अनेक नियम आहेत. या नियमांचे काही वाहनधारकांकडून काटेकोरपणे पालन केल्या जात नाही. अशा वाहनधारकांवर उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाकडून नजर ठेवली जाते. वाहतुकीचे नियम मोडणाºया वाहनधारकांविरूद्ध दंडात्मक कारवाईचा बडगा उगारण्यात येतो. कर न भरणे, अवैध प्रवासी वाहतुक, विमा नसणे तथा ओव्हरलोड वाहनधारकांना दंड ठोठावण्यात येतो. दंडाची रक्कम न भरणाऱ्यांची वाहने जप्त करण्यात येतात. जप्त करण्यात आलेले वाहन त्या त्या कार्यक्षेत्रातील पोलिस स्टेशन किंवा एसटी डेपोमध्ये जमा करण्यात येते. जिल्ह्यात १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०१९ दरम्यान ५७९ वाहने जप्त करण्यात आली. यापैकी ४८६ वाहने मुक्त करण्यात आली आहेत. या वाहनधारकांकडून एक कोटी ६८ लाख ८० हजारांचा दंड वसुल करण्यात आला आहे. जप्त करण्यात आलेल्या वाहनांपैकी अद्याप मुक्त न झालेली ९३ वाहने आहेत. याआधीदेखील उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने जप्त करण्यात आलेली व मुक्त न झालेली बरीच वाहने आहेत. गेल्या तीन ते चार वर्षांपासून हर्रासी न झाल्याने ही वाहने तशीच पडून आहेत. यामुळे पोलीस स्टेशन व एसटी डेपोमधील जागा नाहक अडकून पडत आहे. एवढेच नव्हे तर अनेक वाहने भंगारवस्थेत पडली असल्याचे दिसून येत आहे. भंगार वाहनांची संख्या वाढण्यापूर्वी या वाहनांची विल्हेवाट लावण्यासाठी हर्रासी करणे अपेक्षित आहे.दंड भरण्यासाठी १५ दिवसांची मुदतवाहतुक नियम मोडणाºया वाहनधारकांना दंड भरण्यासाठी १५ दिवसांची मुदत दिल्या जाते. मुदतीत वाहने मुक्त न केल्यास ती वाहने पोलिस स्टेशन व एसटी डेपोच्या आवारात जमा ठेवण्यात येतात. या वाहनांची विल्हेवाट लावण्यासाठी काही नियोजित कालावधीनंतर या सर्व वाहनांची हर्रासी करण्याची प्रक्रिया राबविण्यात येते. ही प्रक्रिया अतिशय किचकट असल्याने अनेक वेळा हर्रासीला विलंब होत असल्याचे दिसून येते.दीड कोटींपेक्षा जास्त कराची वसुलीउपप्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने नियुक्त करण्यात आलेल्या पथकाच्या वतीने २०१९ मध्ये विशेष मोहिम राबविण्यात आली. या मोहिमेदरम्यान कर न भरलेले अनेक वाहनधारक आढळून आले. रस्त्यावर पकडण्यात आलेल्या वाहनधारकांकडून १ कोटी ६५ लाख ६१ हजार रुपयांचा कर वसुल करण्यात आला. अद्यापही कर न भरलेल्यांनी प्राधान्यक्रमाने आपल्या वाहनांचा कर भरावा, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाRto officeआरटीओ ऑफीस