शहरं
Join us  
Trending Stories
1
सुवेंदू अधिकारी यांच्या पीएची हत्या कशी झाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला हल्ल्याचा संपूर्ण थरार!
2
होर्मुझ उघडा, करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बहल्ले; डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा
3
आजचे राशीभविष्य ७ मे २०२६: कामाचा व्याप वाढेल, आज शक्यतो नवीन काम सुरू करू नका
4
भोंदू खरातविराेधात पुढील आठवड्यात पहिले दोषारोपपत्र; कार्यालयातून पुन्हा काही पुरावे गोळा केले
5
SRH vs PBKS : "चुकलो तिथेच फसलो! आता..." पराभवाच्या हॅटट्रिकनंतर ‘सरपंच’ श्रेयस अय्यर स्पष्टच बोलला
6
शेवटच्या वेतनाची ५० टक्के रक्कम पेन्शनपोटी मिळणार; सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू; महागाई भत्ताही साेबत मिळणार
7
संस्थात्मक स्तरावरील फेऱ्यांतून ‘वैद्यकीय’चे प्रवेश बंद? खासगी कॉलेजांमध्ये कॅप फेऱ्यांतूनच ‘प्रवेश’चा प्रस्ताव
8
मुंबई तापणार; तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात गारपीट; जाणून घ्या अपडेट
9
या विकृतीचे करायचे काय?; पुण्यात नातीवरच अत्याचाराचा केला प्रयत्न
10
‘बर्ड फ्ल्यू’मुळे नवापुरातील कोट्यवधींची उलाढाल अचानक ठप्प; हजाराे कामगारांवर उपामारीची वेळ
11
कर्नाळा अभयारण्याजवळून जाणार महामुंबईच्या विकासाचा महामार्ग; केंद्राच्या परिवेश समितीची मंजुरी
12
एकदा घरी फोन करा ना... आई, मला घरी न्यायला ये ना…मनोरुग्णालयातील ‘त्या’ व्यक्ती स्नेहाच्या प्रतीक्षेत
13
शिक्षणाचा हक्क की केवळ कागदी घोडे? ‘आरटीई’ची २,५०० कोटी रुपये थकल्याने शाळा अडचणीत; काय आहे नेमकं प्रकरण?
14
बंगाल : भाजप सरकारचा ९ मे रोजी शपथविधी; तामिळनाडूमध्ये विजय यांना काँग्रेसने दिला पाठिंबा
15
पश्चिम बंगालमधील हिंसाचार शिगेला! सुवेंदू अधिकारी यांच्या PA वर गोळीबार; उपचारादरम्यान मृत्यू
16
इराणशी डील करतोय हे ट्रम्प यांनी सांगितलेच नाही; इस्रायल म्हणतोय, “आम्ही हल्ले सुरू ठेवणार”
17
महाराष्ट्रात पॅटर्न तामिळनाडूत होणार? विजयला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी DMK-AIADMK एकत्र येणार?
18
SRH vs PBKS : सनरायझर्स हैदराबादची अव्वल कामगिरी! ‘त्या’ तीन चुकांमुळे पंजाब किंग्सचा पराभव
19
“काँग्रेसमध्ये आमचे अनेक धुरंधर आहेत, ६ जण निवडूनही आलेत”; हेमंत बिस्वा सरमांचे मोठे विधान
20
Abhishek Sharma Record : १३ चेंडूत ३५ धावा! वादळी खेळीसह अभिषेक शर्मानं मोडला ख्रिस गेलचा विक्रम
Daily Top 2Weekly Top 5

पाल्याच्या जडणघडणीत पालकांची भूमिका महत्त्वाची- रामचंद्र पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2020 14:28 IST

पालकांची भूमिका महत्त्वपूर्ण आहे, असे प्रतिपदान शिवव्याख्याते प्रा. रामचंद्र पाटील यांनी येथे केले.

लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: पाल्याच्या जडणघडणीत पालकांची भूमिका महत्त्वाची आहे. संपत्ती सांभाळण्यासाठी अपत्य निर्माण करण्यापेक्षा वैचारारिक, बौद्धिक आणि प्रगल्भ व सजग समाज निर्मीतीसाठी योगदान देणारे अपत्य निर्माण करणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी पालकांची भूमिका महत्त्वपूर्ण आहे, असे प्रतिपदान शिवव्याख्याते प्रा. रामचंद्र पाटील यांनी येथे केले.
‘शिव चरित्र व आजचा युवक’ या विषयावर स्थानिक गांधी भवनामध्ये १७ फेब्रुवारी रोजी आयोजित व्याख्यानामध्ये ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अ‍ॅड. जयश्री शेळके होते. उद्घाटक म्हणून जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भूजबळ, आ. संजय गायकवाड, शिक्षणाधिकारी श्रीराम पानझडे, शिवजयंती उत्सव समितीच्या अ‍ॅड. जयश्री देशमुख निमंत्रक सुनील सपकाळ, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष अरुण जैन यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
प्रा. रामचंद्र पाटील यांनी शिवचरित्राची महती विषद करतानाच वर्तमानत पालकत्वाची भूमिका एक सुजाण पाल्य घडविण्यासाठी शिवचरित्र किती महत्त्वाचे आहे हे विविध उदाहरणांनी पडवून दिले. शहाजी महाराजांची तलवार, माँ जिजाऊंची वाणी आणि त्यातून घडलेले छत्रपती शिवाजी महाराज याचे अभ्यासपूर्ण विवेचन त्यांनी यावेळी केली. हाच धागा पकडून त्यांनी वर्तमान स्थितीवर बोट ठेवत पालकत्वाची कणखर भूमिका किती महत्वाची आहे, याची उपस्थि जनसमुदायाला जाणिव करून दिली. दरम्यान, इतिहास विसणारे गुलामीके वळतात, असे सांगत प्रगल्भ इतिहासाचा वारसा बुलडाणा जिल्ह्याला मिळाला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना घडविणाऱ्या माँ जिजाऊंचा हा जिल्हा आहे. त्यांनी दिलेल्या समतेचा आदर्श ठेवून प्रत्येक घटकाला सोबतच घेऊन बुलडाणा जिल्हा सध्या वाटचाल करत आहे, असे ते म्हणाले. यावेळी उपस्थित मान्यवरांचीही समयोचित भाषणे झाली. (प्रतिनिधी)

टॅग्स :buldhanaबुलडाणा