शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
2
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
3
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
4
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
5
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
6
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
7
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
8
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
9
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
10
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
11
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
12
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
13
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
14
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
15
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
16
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
17
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
18
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
19
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
20
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 

रोहण्याची झेडपी ‘टॉप’ बनली; ५ वर्षांत विद्यार्थी संख्या वाढली

By अनिल गवई | Updated: February 28, 2024 17:10 IST

मुख्याध्यापक आणि शिक्षकांच्या प्रयत्नांनी शाळेच्या पटसंख्येत गत पाच वर्षांत  वाढ झाली आहे.

खामगाव: अलीकडच्या काळात विद्यार्थ्यांवर कॉन्व्हेंट संस्कृतीचा प्रभाव वाढत असतानाच, खामगाव तालुक्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये जिल्हा परिषद शाळेची ओढ वाढत असल्याचे दिसून येते. रोहण्याची झेडपी शाळा टॉप बनली असून  सामूहिक प्रयत्नांतून शाळेचे रूपडे पालटले आहे. मुख्याध्यापक आणि शिक्षकांच्या प्रयत्नांनी शाळेच्या पटसंख्येत गत पाच वर्षांत  वाढ झाली आहे.

खामगाव तालुक्यातील रोहणा येथे जिल्हा परिषदेची हायस्कूल आहे. या हायस्कूलची स्थापना २६ जानेवारी १९७२ रोजी झाली असून, सुरुवातीच्या काळात पंचक्रोशीत असलेल्या या एकमेव शाळेने अनेक विद्यार्थी घडविले. मध्यंतरी कॉन्व्हेंट संस्कृतीमुळे शाळेला उतरती कळा लागल्याचे शल्य शिक्षकांना आणि ग्रामस्थांना बोचत होते. गावातील सामाजिक कार्यकर्ते आणि मुख्याध्यापक, शिक्षकांच्या सकारात्मक प्रयत्नातून गावातील अनेकांची रोल मॉडेल असलेल्या शाळेला आता पूवर्वत स्वरूप प्राप्त होत आहे. त्यामुळे परिसरातील कोन्टी, बोथा, नांद्री, काळेगाव, वर्णा, गोंधनापूर, निमकोहळा येथील विद्यार्थ्यांसह पालकांचाही या शाळेत प्रवेशासाठी ओढा वाढला आहे. गतवर्षी बोथा येथील ३७ तर नांद्री येथील १८ विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी या शाळेला प्राधान्य दिले. वर्णा, कोन्टी, निमकोहळा, काळेगाव, पोरज येथील विद्यार्थ्यांचीही जिल्हा परिषद शाळेत प्रवेशासाठी धडपड सुरू असल्याचे चित्र दिसून येते.

शाळेत तालुक्यातील एकमेव प्रयोग केंद्र

खामगाव तालुक्यातील विज्ञानाचे एकमेव प्रयोग केंद्र रोहणा येथील जिल्हा परिषद हायस्कूलमध्येच आहे. शिवाय याच शाळेत तांत्रिक शिक्षण दिले जात असून या शाळेतील अनेक विद्यार्थ्यांची पॉलिटेक्निक आणि शासकीय तंत्र निकेतनमध्ये निवड झाली आहे. काही विद्यार्थी मोठ्या पदावरही नोकरीला लागले आहेत.

सामूहिक प्रयत्नांतून रोहणा येथील जिल्हा परिषद हायस्कूलने कात टाकली आहे. जिल्हा परिषद प्रशासन, शाळेतील शिक्षकांच्या प्रयत्नातून तसेच पालकांच्या समुपदेशनातून शाळेच्या पटसंख्येत गत पाच वर्षांत सरासरी ६० ते ७० विद्यार्थ्यांची भर पडली आहे. - पुष्पा प्रमोद कोळी(मुख्याध्यापक, जि. प. हायस्कूल, रोहणा ता. खामगाव.)

टॅग्स :khamgaonखामगावbuldhanaबुलडाणा