शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

भालगाव येथील शेतकऱ्याच्या घरावर दरोडा; ३़ ७० लाखांचा ऐवज लंपास, भालगाव येथील घटना 

By संदीप वानखेडे | Updated: September 9, 2023 17:54 IST

भालगाव येथील शेतकरी गजानन माधव परिहार हे आई सुमनबाई, वडील माधव, पत्नी गीता, बहीण मालता परिहार यांच्यासह शेतात बांधलेल्या घरात वास्तव्यास आहेत.

चिखली (बुलढाणा) : तालुक्यातील भालगाव येथील एका घरावर सहा सशस्त्र दरोडेखोरांनी घरफोडी करून शस्त्राचा धाक दाखवीत ३ लाख ७० हजारांचा ऐवज जबरीने लंपास केला़ ही घटना ८ सप्टेंबरच्या रात्री साडेअकरा ते दीड वाजेच्या सुमारास सुमारास घडली. भालगाव येथील शेतकरी गजानन माधव परिहार हे आई सुमनबाई, वडील माधव, पत्नी गीता, बहीण मालता परिहार यांच्यासह शेतात बांधलेल्या घरात वास्तव्यास आहेत. त्यांच्या या घरात ८ सप्टेंबरच्या रात्री साडेअकरा वाजता तोंडाला रुमाल, अंगात रेनकोट व डोक्यात टोपी घातलेल्या ३५ ते ४० वर्षे वयोगटातील सहा सशस्त्र दरोडेखोरांनी घरात प्रवेश केला. 

अज्ञात चोरटे घरात प्रवेश केल्याचे समजताच गजानन परिहार यांच्या आईने आरडाओरड केल्याने घरातील सर्व सदस्य जागे झाले. मात्र, दरोडेखोरांनी परिहार यांच्या आई, वडील, पत्नी व बहिणीस चाकूचा धाक दाखवीत आवाज कराल तर मारून टाकू, अशी धमकी देत दमदाटी केली. दरम्यान, तिघांनी शस्त्राच्या धाकावर कुटुंबातील सर्वांवर पाळत ठेवण्यासह महिलांच्या अगांवरील मणी-मंगळसूत्र, कानातील बाळ्या, हातातील चांदीचे कडे आदी दागिने जबरीने काढून घेतले. तर इतर ३ दरोडेखोरांनी देवघरातील पत्र्याची पेटी फोडून त्यातील एक-एक तोळ्याच्या दोन सोन्याच्या एकदाण्या, एक तोळ्याची सोन्याची गहुपोत, एक तोळ्याचे सोन्याचे झुंबर, ५ ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी असे एकूण ३ लाख १५ हजारांचे सोन्या-चांदीचे दागिणे, तसेच एका पेटीतील रोख ३० हजार, लोखंडी कपाटातील ५ हजार असे रोख ३५ हजार आणि बेडरूमधील सॅमसंग कंपनीचा एक दहा हजारांचा टॅब, पाच-पाच हजार रुपये किमतीचे दोन मोबाइल लंपास केले.

दाेन तास ठेवले कुटुंबीयांना ओलिसया दरोडेखोरांनी तब्बल दोन तास सर्वांना ओलिस ठेवत घरात दहशत माजविली होती. दरम्यान, फारार होताना ज्या खोलीत सर्वांना डांबले होते त्या खोलीचा दरवाजा बाहेरून बंद केला होता. शिवाय कोणाशी संपर्क होऊ नये म्हणून मोबाइल देखील लंपास केल्याने पहाटे सव्वा सहा वाजेपर्यंत या कुटुंबास कोणतीही मदत मिळाली नाही. अथक प्रयत्नांनी तार टाकून घराबाहेरील कडी उघडत कुटुंबीयांनी यातून सुटका करून घेतल्यानंतर गावात याबाबत माहिती देऊन पोलिसांना पाचारण केले. या प्रकरणी दराेडेखाेरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

टॅग्स :buldhanaबुलडाणाtheftचोरी