शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

आर.ओ. घोटाळा प्रकरणात ग्रामसेवकांवर कारवाईस टाळाटाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2018 13:43 IST

खामगाव : खामगाव तालुक्यातील  आर.ओ. घोटाळा प्रकरणात प्रथमदर्शनी ग्रामसेवक दोषी आढळले असतानाही अद्याप त्यांच्यावर कारवाईस जिल्हा परिषद प्रशासनाकडून टाळाटाळ केली जात असल्याचे वास्तव आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : खामगाव तालुक्यातील  आर.ओ. घोटाळा प्रकरणात प्रथमदर्शनी ग्रामसेवक दोषी आढळले असतानाही अद्याप त्यांच्यावर कारवाईस जिल्हा परिषद प्रशासनाकडून टाळाटाळ केली जात असल्याचे वास्तव आहे. तर विस्तार अधिकारी निलंबीत होवून आठवडा उलटला तरी अद्याप १२ पैकी एकाही गावातील ग्रामसेवकावर कारवाई करण्यात आली नसल्याचे दिसून येते. खामगाव तालुक्यातील १२ गावात  आर.ओ.प्लांट बसविण्याचे नियोजन गेल्या वर्षी करण्यात आले होते. आर.ओ. प्लांटचे २ लाख ९९ हजार ५०० रुपयाचा निधी संबधित ग्रामपंचायतच्या बँक खात्यातून ११ व १२ फेब्रुवारी २०१७ रोजी कपात सुद्धा झाला.  मात्र अद्याप एकाही गावात आर.ओ. प्लांट लागले नसल्याचा प्रकार ‘लोकमत’ने उघड केल्यानंतर या प्रकरणाची तक्रार गणेशपूर कुंभेफळ जिल्हा परिषद सर्कलच्या सदस्या रेखा चंद्रशेखर महाले यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केली. त्यानंतर उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय चोपडे यांनी खामगाव तालुक्यातील माटरगाव, गेरू, बोरजवळा, भंडारी, झोडगा, पिंप्री कोरडे, निरोड, लोणी गुरव, पिंप्री धनगर, टाकळी, हिवरा खुर्द, अंत्रज, शेलोडी आदी गावांना भेटी देवून चौकशी केली. त्यासोबतच ग्रामिण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्यावरही चौकशीची स्वतंत्र जबाबदारी सोपविण्यात आली होती. मात्र त्यांनी अद्याप त्याला अहवाल मुख्य कार्यकारी अधिकाºयांकडे पाठवला नाही. त्यामुळे ग्रामसेवकावर कारवाईस विलंब होत आहे.

टॅग्स :khamgaonखामगावbuldhanaबुलडाणा