शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

विद्यार्थ्यांसाठी शाळेत बसविला ‘आरओ प्लांट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 09, 2019 6:16 PM

विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने त्यांना शुद्ध पाणी पिण्यास मिळावे, यासाठी शाळेतच ‘आरओ वॉटर प्लांट’  सुरू करण्यात आला आहे.

लोणार: स्थानिक श्री शिवाजी हायस्कूल व महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने त्यांना शुद्ध पाणी पिण्यास मिळावे, यासाठी शाळेतच ‘आरओ वॉटर प्लांट’  सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचा शुद्ध पेयजलाचा प्रश्नही मार्गी लागला आहे. तसेच यावेळी काही गरजू विद्यार्थ्यांना गणवेश वितरणही करण्यात आले. आरओ वॉटर प्लांटचा शुभारंभ विमलबाई साहेबराव मापारी यांच्याहस्ते करण्यात आला. यावेळी अकोला येथील डॉ. भूषण मापारी, डॉ. सूनील मापारी, श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. खुशालराव मापारी, संस्थेचे सचिव प्रकाशराव मापारी, डॉ. उज्वला मापारी, डॉ. नंदिनी मापारी व संस्थेचे सर्व पदाधिकारी व संचालक उपस्थित होते. दोन लाख रुपये किंमत असलेल्या हा आरटो प्लांट डॉ. सुनिल मापारी यांनी स्वखर्चातून बसविला आहे. त्यामुळे ३ ते ४ हजार विद्यार्थ्यांना दररोज शुद्ध पेयजल मिळणार आहे. या कार्यक्रमाच्या वेळी डॉ. सुनील मापारी यांनी ज्या शिक्षकांनी त्यांना घडविले त्या शिक्षकांचे व्यासपीठावर आशीर्वाद घेतले. या कार्यक्रमांमध्ये दहावी व बारावीमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.  तसेच गरजू विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करून एक सामाजिक बांधिलकी जोपासली.  कार्यक्रमाला शिवाजी शिक्षण संस्थेचे प्राचार्य गणेश  मुंढे, संस्थेचे उपाध्यक्ष प्रताप इंगोले, प्रा. बळीराम मापारी, संचालक राजेश मापारी संचालक डॉ. अनिल मापारी, डॉ. विक्रांत मापारी, राहूल मापारी, विजय मापारी यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. संचालन शेवाळे यांनी केले. (शहर प्रतिनिधी)

टॅग्स :buldhanaबुलडाणाLonarलोणार