शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

आरओ प्लांट घोटाळा प्रकरण : अपहाराची रक्कम वेतनातून वसूल केली जाणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2020 18:14 IST

१२ गावात अद्याप आर.ओ.प्लांट लागले नसल्याची बाब सर्वप्रथम  लोकमतने उघड केली होती.

- योगेश फरपटलोकमत न्यूज नेटवर्कखामगाव :  आर.ओ.प्लांट प्रकरणात तत्कालीन गटविकास अधिकारी के.डी.शिंदे, विस्तार अधिकारी ए.जी.राठोड यांच्यासह १० ग्रामसेवक दोषी आढळले आहेत. याप्रकरणी गटविकास अधिकारी के.डी.शिंदे यांच्यावर कारवाईचा प्रस्ताव मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी विभागीय आयुक्तांकडे पाठवला आहे. तर १० पैकी ९ ग्रामसेवकांच्या पगारातून अपहाराची रक्कम वसूल करण्यात यावी असे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी जि.प.पंचायत विभागामार्फत विद्यमान गटविकास अधिकारी यांनी दिले आहेत. लोकमतने नोव्हेंबरमध्ये उघड केलेल्या आर.ओ.प्लांट घोटाळ््याप्रकरणी अखेर जिल्हाप्रशासनाने कारवाई केली हे विशेष. खामगाव तालुक्यातील विविध ग्रामपंचायतीमध्ये चौदाव्या वित्त आयोगातून नागरिकांना शुद्ध पाणी पिण्यासाठी उपलब्ध व्हावे. या हेतूने आर.ओ.प्लांट बसविण्याचे नियोजन २०१८ मध्ये करण्यात आले. नागरिकांनाही शुद्ध पाण्याची व्यवस्था उपलब्ध होवू शकेल या सकारात्मक हेतूने सरपंचांनी सुद्धा प्रस््तावाला मान्यता दिली. त्यानुसार आर.ओ. प्लांटचे २ लाख ९९ हजार ५०० रुपयाचा निधी संबधित ग्रामपंचायतच्या बँक खात्यातून ११ व १२ फेब्रुवारी २०१७ रोजी कपात सुद्धा झाला. मात्र अद्याप १२ पैकी एकाही गावात आर.ओ.प्लांट लावण्यात आले नाहीत. १२ गावात अद्याप आर.ओ.प्लांट लागले नसल्याची बाब सर्वप्रथम  लोकमतने उघड केली होती. प्रकरणाच्या मुळाशी जावून यातील बारकावे मांडण्यात आले होते. गणेशपूर कुंभेफळ जिल्हा परिषद सर्कलच्या सदस्या रेखा चंद्रशेखर महाले यांनी ही बाब मुख्य कार्यकारी अधिकारी यांना ही बाब निदर्शनास आणून देत तक्रार दाखल केली होती. त्यानुषंगाने उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत विभाग) मार्फत सखोल चौकशी झाली. त्यात लोणीगुरव, निरोड, अंत्रज, पिंप्री धनगर, हिवराखुर्द, झोडगा, पिंप्री कोरडे, टाकळी तलाव, भंडारी, बोरजवळा येथील ग्रामसेवक चौकशीत दोषी आढळले असून त्यांनी अपहार केल्याचे मान्य सुद्धा केले आहे. याचप्रकरणात पहिल्याच झटक्यात खामगाव पंचायत समितीचे विस्तार अधिकारी ए.जी.राठोड हे निलंबीत झाले होते. त्यानंतर आता तत्कालीन गटविकास अधिकारी के.डी.शिंदे हे सुद्धा प्रथमदर्शनी दोषी आढळल्याचा अहवाल मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी विभागीय आयुक्तांकडे सादर केला आहे. 

बिडीओ के.डी.शिंदेंविरुद्ध कारवाईचा प्रस्ताव! खामगाव पंचायत समितीअंतर्गत ग्रामपंचायतीने केलेल्या आर.ओ.प्लाँट घोटाळा प्रकरणात तत्कालीन गटविकास अधिकारी के.डी..शिंदे हे सुद्धा दोषी आढळले आहेत. त्यांच्याविरुद्ध प्रशासकीय कारवाईचा प्रस्ताव मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी विभागीय आयुक्तांकडे सादर केला आहे. या ग्रामसेवकांनी केले आरोप मान्य आर.ओ.प्लांट घोटाळा प्रकरणात विस्तार अधिकारी ए.जी.राठोड यांच्यसह ग्रामसेवक एस.जे.वानखेडे (लोणीगुरव), पि.एस.आपोतीकर (निरोड), एस.जी.जोशी (अंत्रज), ए.एन.काकडे (पिंप्री धनगर), कु.जि.एम.चव्हाण (हिवराखुर्द), सि.एम.जाधव (झोडगा), कु. एल.एस.मोरे (पिंप्री कोरडे), व्हि.जी.गिºहे (टाकळी तलाव), कु.एस.पी.क्षिरसागर (भंडारी,बोरजवळा) या ग्रामसेवकांनी आरोप मान्य केले आहेत. त्यांची एका वषार्साठी वेतनवाढ रोखण्यात आली आहे. तर शेलोडी ग्रामसेवक बि.डी.धांडगे यांची सेवानिवृत्ती झाल्याने त्यांची वेतनवाढ रोखण्यात येणार नसल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी स्पष्ट केले आहे. 

खामगाव तालुक्यातील आर.ओ.प्लांट घोटाळयाप्रकरणी ग्रामसेवकांची वेतनवाढ रोखण्यात आली आहे. अपहाराच्या रक्कम वसूलीची पुढील कारवाई खामगाव गटविकास अधिकारी करणार आहेत. - राजेश लोखंडेउपमुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प.बुलडाणा

ग्रामसेवकांनी आर.ओ.प्लांट खरेदी अपहार केल्याचे मान्य करूनही प्रशासनाने त्यांचे निलंबन न करता थातूरमातूर कारवाई केली आहे. यासंदर्भात विभागीय आयुक्तांकेड दाद मागणार आहे. - रेखा चंद्रशेखर महाले, जिल्हा परिषद सदस्य, गणेशपूर-कुंभेफळ सर्कल.

टॅग्स :khamgaonखामगाव