शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

रोजगार हमी योजनेतील रोपांचे होणार ऑडिट

By admin | Updated: September 10, 2014 02:12 IST

बुलडाणा जिल्ह्यातील रोजगार हमी योजनेच्या ३६ कामांची १७ दिवसांततपासणी होणार

बुलडाणा : रोजगार हमी योजनेतून तीन वर्षांत लावण्यात आलेल्या रोपांची तपासणी करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. यातून बुलडाणा जिल्ह्यासाठी २१ दिवसात १३९ काम तपासणीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे; मात्र स्थानिक सामाजिक वनीकरण विभागाकडून मात्र १७ दिवसात केवळ ३६ कामांची तपासणी करण्यात आली आहे. तर उर्वरित सात दिवसात १0३ कामांची तपासणी करण्याचे उद्दिष्ट सामाजिक वनीकरण विभागापुढे आहे.रोजगार हमी योजनेतून ग्रामपंचायत स्तरावर किती रोपे जगली, किती रोपे मृत झाली, नवीन रोपे लावता येणे शक्य आहे काय, याची तपासणी करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. सामाजिक वनीकरण विभागाच्या राष्ट्रीय हरीत सेनेच्या शाळांतील विद्यार्थ्यांच्या मदतीने २५ ऑगस्ट ते १५ सप्टेंबर या २१ दिवसाच्या कालावधीत काम पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.बुलडाणा जिल्ह्यात गेल्या तीन वर्षात रोजगार हमी योजनेतून रोप लागवडीची ४१८ कामे ग्रामपंचायत स्तरावर करण्यात आली. यात २0११-१२ या वर्षात १६५, २0१२-१३ मध्ये ४६ आणि २0१३-१४ मध्ये २0७ काम करण्यात आली. यापैकी २५ ऑगस्ट ते १५ सप्टेंबर दरम्यान १३९ कामांची तपासणी सामाजिक वनीकरण विभागाकडून करायची आहे; मात्र ८ सप्टेंबरपर्यंत केवळ ३६ कामांची तपासणीच पूर्ण झाली आहे. या आठवड्यात दमदार पाऊस झाल्यामुळे अनेक ठिकाणी तपासणी पथकास अडचणी येत आहेत. येणार्‍या काही दिवसात तपासणी कामास वेग येणार असल्यामुळे वेळेत लेखा परीक्षण पूर्ण होणार आहे.