शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा शहरातील खड्ड्यांमुळे अपघाताचा धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2019 14:19 IST

बुलडाणा : शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांचे ग्रहण सुटण्याचे काही चिन्ह दिसत नाही. रस्त्यांवर जागोजागी पडलेल्या खड्ड्यांमुळे नागरिकांची प्रचंड गैरसोय होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांचे ग्रहण सुटण्याचे काही चिन्ह दिसत नाही. रस्त्यांवर जागोजागी पडलेल्या खड्ड्यांमुळे नागरिकांची प्रचंड गैरसोय होत आहे. पालिका प्रशासनाकडून मात्र दुरुस्तीसंदर्भात कुठलीच कार्यवाही होत नसल्याचे दिसून येत आहे.बुलडाणा शहरातील रस्त्यांवर पडलेले खड्डे नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहेत. खड्ड्यांमुळे वाहनधारकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. पावसाचे पाणी खड्ड्यात साचत असल्याने त्यामधून मार्ग काढणे अवघड झाले आहे. अनेक ठिकाणी तर संपूर्ण रस्ता खड्ड्यात हरवल्याचे चित्र आहे. त्यामुळे रस्ता कोणता व खड्डा कोणता हे कळायला मार्ग नाही. अशावेळी वाहन कसे चालवावे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. खड्डे दुरुस्ती करावे, अशी मागणी शहरातील नागरिकांकडून अनेकदा करण्यात आली. परंतू संबंधित विभागाकडून याकडे दुर्लक्ष झाले आहे. वेळोवेळी निवेदने, तक्रारी करुनही कुुठलीच कार्यवाही करण्यात आली नसल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे. प्रमुख मार्गासह अंतर्गत रस्त्यावर खड्डे पडलेले आहेत. मात्र दुरुस्ती करण्यात आलेली नाही. त्यामुळे समस्या तशीच कायम आहे.बुलडाणा शहरातील बसस्थानक ते तहसील चौक रस्त्यावर जागोजागी खड्डे पडलेले आहेत. नेहमीच या रस्त्यावर खड्डे पडलेले असतात. कायम वर्दळीचा असलेला हा रस्ता खड्डेमय झाला आहे. परंतू खड्ड्यांची दुरुस्ती करण्याची चिन्हे दिसत नसल्याने नागरिकांचा हिरमोड होत आहे. शहरातील अनेक ठिकाणी रस्त्यांची चाळण झाली आहे. बसस्थानकापासून ते चिंचोले चौकाकडे जाणारा रस्ता असाच खड्ड्यात हरवला आहे. जागोजागी लहान, मोठे खड्डे पडले आहेत. या रस्त्याने शिकवणीसाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी असते. विद्यार्थी सायकल, दुचाकीने शिकवणीसाठी जातात. परंतू रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे त्यांना कसरत करावी लागते. विशेषता विद्यार्थिनींना जास्त त्रास सहन करावा लागतो. खड्डे दुरुस्त करुन समस्या कायमची मार्गी लावावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

खड्ड्यांमुळे रहदारीस अडथळारस्त्यावर खड्डे पडल्यामुळे रहदारीस मोठ्या प्रमाणावर अडथळा निर्माण होत आहे. खड्ड्यांमधून मार्ग काढणे वाहनधारकांसाठी कसरत ठरत आहे. खड्ड्यांमुळे अपघाताच्या किरकोळ घटना समोर येत आहेत. त्यामुळे संबंधित विभागाने खड्डे दुुरस्तीकडे ध्यान देण्याची गरज निर्माण झाली आहे.जयस्तंभ चौकातून आयडीबाय बँकेकडे येणाºया रस्त्यावर गॅरेज व इतर व्यावसायीकांची दुकाने आहेत. जिजामाता व्यापारी क्रीडा संकुलमध्ये जाणाऱ्यांसाठी हा रस्ता सोयीचा आहे. परंतू रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडलेले आहेत. येथील व्यापारी अनेक वर्षांपासून प्रशासनाकडे पाठपुरावा करीत आहेत. मात्र अद्यापही खड्डे दुरुस्ती करण्यात आलेली नाही. त्यामुळे आहे त्याच रस्त्यावरुन मार्ग काढल्याशिवाय पर्याय नाही.खड्ड्यात पावसाचे पाणी साचल्याने रस्ता दिसत नाही. बाजार गल्लीतील रस्त्यावर पाणी साचल्यावर मार्ग कसा काढावा असा प्रश्न पडतो.

टॅग्स :buldhanaबुलडाणाpwdसार्वजनिक बांधकाम विभाग