शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा जिल्ह्याच्या विकासाची गाडी योग्य रूळावर -  उध्दव ठाकरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2019 14:18 IST

खामगाव : गत पाचवर्षांच्या कालावधीत जिल्ह्याच्या विकासाची गाडी योग्य रूळावर असल्याची ग्वाही शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी येथे दिली.

- अनिल गवई खामगाव : गत पाचवर्षांच्या कालावधीत जिल्ह्याच्या विकासाची गाडी योग्य रूळावर असल्याची ग्वाही शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी येथे दिली.लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने खामगाव येथील जी. वी. मेहता विद्यालयाच्या प्रांगणात आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. शिवसेना-भाजपा-रासपा महायुतीचे बुलडाणा लोकसभा मतदार संघाचे उमेदवार प्रतापराव जाधव यांच्या प्रचारार्थ शुक्रवारी ही जाहीरसभा पार पडली.यावेळी बुलडाणा जिल्ह्यातील विकासाच्या मुद्यांना हात घालताना, गत पाच वर्षांत खामगाव-जालना रेल्वे मार्गासह खामगाव जिल्ह्याचा प्रश्न मार्गी लागला नसल्याची वस्तुस्थिती आहे. मात्र, खामगाव- जालना रेल्वेमार्गासाठी रेल्वेच्या अर्थसंकल्पात ३ हजार कोटींची तरतूद करण्यात आली. या रेल्वे मार्गाच्या भूसंपादनाची प्रक्रीया सुरू आहे. त्यामुळे गेल्या ५० वर्षांत ज्या विषयाला कुणीही हात लावत नव्हतं तो विषय पुढे सरकला. खामगाव जिल्हा निर्मितीच्या प्रक्रीयेनेही गती घेतली आहे. इतकेच नव्हे तर, बुलडाणा जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय निर्मितीचाही प्रश्न मार्गी लागला आहे. दिलेलं वचन पाळणारांपैकी आपण असून, गत काही दिवसांमध्ये शिवसेना-भाजप युतीतील ‘खट्टा-मिठा’संबंधामुळं अनेक प्रश्न प्रलंबित होते. मात्र, यापुढे तुमच्या ताटात गोड वाढण्यासाठीच ही युती झाली असल्याचे स्पष्टीकरण त्यांनी दिले. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला जे ५० वर्षांत जमलं नाही; ते युतीनं पाच वर्षात केलं. यापुढेही शेतकरी, कष्टकरी आणि गोर गरीबांसाठी युतीची घोडदौड सुरूच राहणार असल्याचेही त्यांनी शेवटी स्पष्ट केले. सभेचे संचालन अ‍ॅड. बाबू भट्टड यांनी केले.या नेत्यांनी गाजविले मैदान !ना. रणजीत पाटील, ना. संजय राठोड, ना. गुलाबराव पाटील, खा. विकास महात्मे, शिवसंग्रामचे नेते विनायकराव मेटे, रासपचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेवराव जानकर, आ. चैनसुख संचेती, आ. संजय कुटे, आ. आकाश फुंडकर, आ. शशीकांत खेडेकर, आ. संजय रायमुलकर, संजय गायकवाड यांचीही यावेळी समायोचित भाषणे झालीत. बुलडाणा लोकसभा मतदार संघाचे उमेदवार प्रतापराव जाधव यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले.मोबाईलच्या दिव्यात पटविली साक्ष!स्थानिक खामगाव येथील जी.वी. मेहता मैदानावर जिल्ह्यातील मतदार आणि युतीच्या शिलेदारांची भरगच्च गर्दी येथे जमली होती. सन २००९ आणि २०१४ च्या जाहीर सभांचा उच्चांकही शुक्रवारच्या सभेनं मोडीत काढला. मैदानावरील गर्दी दाखविण्यासाठी उपस्थितांच्या मोबाईलचे दिवे लावण्याचे आवाहन प्रतापराव जाधव यांनी करताच, मैदानावर सर्वदूर मोबाईलचे दिवे चमकले.गोपीनाथ मुंडे; भाऊसाहेबांचे स्मरण!लोकनेते गोपीनाथ मुंडे आणि मातृतिर्थ बुलडाणा जिल्ह्याचे सुपुत्र स्व. भाऊसाहेब फुंडकर यांची या सभेला प्रामुख्याने अनुपस्थिती जाणवली. आ. संजय रायमुलकर, आ. आकाश फुंडकर, प्रतापराव जाधव यांच्यासह दस्तुरखुद्द उध्दव ठाकरे यांनी स्व. गोपीनाथ मुंडे आणि भाऊसाहेबांचे स्मरण केलं. त्यांच्या अनुपस्थित त्यांनी आयुष्यभर लढा दिलेल्या शक्तीला उभं करण्याच पातक करू नका!, असे भावनिक आवाहनही यावेळी उध्दव ठाकरे यांनी केले. उच्चांकी गर्दी ही दोन्ही लोकनेत्यांना श्रध्दांजली असल्याचे महायुतीचे नेते म्हणाले.

टॅग्स :buldhana-pcबुलडाणाMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019Uddhav Thackerayउद्धव ठाकरेPrataprao Jadhavप्रतावराव जाधवShiv Senaशिवसेनाkhamgaonखामगाव