शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
5
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
6
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
7
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
8
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
9
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
10
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
11
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
12
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
13
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
14
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
15
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
16
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
17
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
18
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
19
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
20
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

Right To Education : सात दिवसात १७०० प्रवेशाचे आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 11:44 IST

Right To Education : ७ दिवसात १७०० प्रवेशांचे आव्हान शिक्षण विभागासमाेर आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : आरटीई अंतर्गंत बालकांची निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे प्रवेश संथगतीने सुरू असल्याचे चित्र आहे. लाॅटरी पद्धतीने निवड झालेल्या केवळ १०५ विद्यार्थ्यांनीच प्रवेश प्रक्रीया पूर्ण केली आहे. तसेच ४०३ विद्यार्थ्यांनी तात्पुरते प्रवेश घेतले आहेत. आता ७ दिवसात १७०० प्रवेशांचे आव्हान शिक्षण विभागासमाेर आहे.आरटीई प्रवेश प्रक्रीयेसाठी राज्यभरात ७ एप्रिल राेजी पहिली लाॅटरी काढण्यात आली हाेती; मात्र काेराेना संसर्ग वाढत असल्याने प्रवेश प्रक्रीया लांबवणीवर टाकण्यात आली हाेती. त्यानंतर ११ जून पासून प्रवेश प्रक्रीया सुरू करण्यात आली आहे. गत १२ दिवसात केवळ १०५ विद्यार्थ्यांनीच प्रवेश घेतले आहेत.यावर्षी आरटीईसाठी जिल्हाभरातील २३१ शाळांनी नाेंदणी केली हाेती. जिल्ह्यात २ हजार १४२ जागांसाठी ही प्रवेश प्रक्रीया राबवण्यात आली आहे.  या जागांसाठी जिल्हाभरातून ३ हजार ४४५ पालकांनी अर्ज दाखल केले हाेते. त्यापैकी लाॅटरी पद्धतीने पहिल्या फेरीत १ हजार ८७९ बालकांची निवड झाली आहे. ११ जून पासून प्रवेश प्रक्रीया सुरू करण्यात आली असून २३ जून पर्यंत केवळ १०५ बालकांनी प्रवेश प्रक्रीया पूर्ण केली आहे. तसेच ४०३ बालकांच्या पालकांनी तात्पुरते प्रवेश घेतले आहेत. काेराेना संसर्ग वाढत असल्याने प्रवेश प्रक्रीया रखडली हाेती. काेराेना संसर्ग कमी झाल्याने आता अनलाॅक प्रक्रीया सुरू झाली आहे. त्यानंतर आरटीई अंतर्गंत प्रवेश प्रक्रीया सुरू करण्यात आली आहे. ११ जून पासून प्रवेश प्रक्रीयेस प्रारंभ करण्यात आला असून ३० जूनपर्यंत शाळा स्तरावर प्रवेश घ्यावा लागणार आहे. निवड झालेल्या पालकांनी शाळेत जाऊन प्रवेश घ्यावे. तसेच प्रवेशावेळी गर्दी करू नये, असे आवाहन शिक्षण विभागाने केले आहे.  आरटीई प्रवेशासाठी समित्यांचीही स्थापना करण्यात आली आहे. या समित्या तक्रारी साेडवणार आहेत. 

आरटीई अंतर्गंत लाॅटरी पद्धतीने १ हजार ८७९ बालकांची निवड झाली आहे. ३० जूनपर्यंत प्रवेश घेता येणार आहे. समितीस्तरावर कागदपत्रे पडताळणी सुरू असल्याने विहीत मुदतीत पहिल्या टप्यात निवड झालेल्या सर्व बालकांचे प्रवेश हाेतील, अशी अपेक्षा आहे. ज्या बालकांची निवड झाली आहे त्यांनी प्रवेश प्रक्रीया पूर्ण करावी.सचिन जगताप, शिक्षणाधिकारी, प्राथमिक, बुलडाणा

टॅग्स :Right To Educationशिक्षण हक्क कायदाbuldhanaबुलडाणाEducation Sectorशिक्षण क्षेत्र