शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

श्रीमंतांकडूनही गॅस अनुदान सुटेना!

By admin | Updated: August 6, 2016 02:15 IST

केवळ पाच टक्केच ग्राहकांचा अनुदानास नकार : बुलडाणा जिल्ह्यात तीन लाखांवर सिलिंडरधारक .

ब्रह्मनंद जाधवबुलडाणा, दि. ५ : जिल्ह्यात सुमारे ३ लाख ११ हजार ३९१ गॅस सिलिंडर ग्राहक आहेत; मात्र यातील केवळ १७ हजार १४६ म्हणजे ५.५0 टक्केच गॅसधारकांनी गॅस अनुदान घेण्यास नकार दिला आहे. आर्थिक क्षमता चांगली असणार्‍यांनी गॅस अनुदानाचा गोरगरिबांसाठी स्वत:हून त्याग करावा, असे आवाहन शासनाकडून वारंवार करण्यात आले आहे. तरीसुद्धा जिल्ह्यातील श्रीमंत असलेल्या गॅसधारकांकडूनही अनुदान सुटत नसल्याचे दिसून येत आहे.घरगुती वापराच्या गॅससिलिंडरपोटी शासनाकडून अनुदान देण्यात येते. त्यामध्ये आर्थिक क्षमता चांगली असणार्‍या गॅसधारकांनी गॅस अनुदानाचा स्वत: हून त्याग करावा, असे आवाहन वारंवार करण्यात येत आहे. या अनुदानाचा लाभ गरजू लाभार्थ्यांना देण्यात येतो. त्यासाठी सर्व गॅस कंपन्यांनी मिळून गॅस अनुदान परत करण्यासाठी ह्यगिव्ह इट अपह्ण ही मोहीम हाती घेऊन गॅस सिलिंडरवरील सबसिडीचा स्वत:हून त्याग करावा, असे आवाहन केले; मात्र या मोहिमेला पाहिजे तसा प्रतिसाद दिसून आला नाही. जिल्ह्यात गॅसधारकांची एकूण संख्या लक्षात घेता, अनुदान नाकारणार्‍या ग्राहकांची संख्या खूपच कमी आहे. जिल्ह्यात सुमारे ३ लाख ११ हजार ३९१ गॅस सिलिंडर ग्राहक आहेत. यातील केवळ १७ हजार १४६ म्हणजे ५.५0 टक्केच गॅसधारकांनी गॅस अनुदान घेण्यास नकार दिला आहे. शासनाने सुरुवातीला गॅस अनुदानाचा लाभ घेण्यासाठी आधार लिंक करण्याचे बंधनकारक केले. यामध्ये शंभर टक्के लोकांनी आधार लिंक करावे म्हणून आधार लिंक न करणार्‍या ग्राहकांना गॅस सिलिंडर न देण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. यामुळे जिल्ह्यात ३ लाख ११ हजार ३९१ गॅस सिलिंडर ग्राहकांपैकी २ लाख ११ हजार ६0 ग्राहकांनी गॅस सिलिंडर आधार लिंक केले आहे. त्यामुळे आधार लिंक केलेल्या सर्व ग्राहकांच्या बँक खात्यात सध्या गॅस अनुदान जमा होते. त्यामुळे आधार लिंक झाले व गॅस सिलिंडरचे अनुदान नाकारायचे आहे, त्यांना आता संबंधित गॅस एजन्सीकडे स्वतंत्र अर्ज भरून द्यावा लागणार आहे. हा अर्ज भरून दिल्यानंतर संबंधित ग्राहकांना आपण नाकारलेले गॅस अनुदानाचा कोणाला लाभ झाला, हे त्यांच्या मोबाइलवर एसएमएसद्वारे कळविण्यात येते. गॅसधारकांच्या संख्येच्या तुलनेत गॅस अनुदान सोडणार्‍या गॅसधारकांची संख्या अत्यंत कमी असल्याने जनजागृतीची गरज निर्माण झाली आहे. बचत केवळ ३४ लाख रुपयांची गॅस सिलिंडरच्या दरानुसार सरासरी १८0 ते २00 रुपयांचे अनुदान गॅस सिलिंडर ग्राहकांच्या बँक खात्यात जमा होते. जिल्ह्यात गॅस अनुदान नाकारलेल्या ग्राहकांची संख्या १७ हजार १४६ आहे. यामुळे सध्या जिल्ह्यात गॅस अनुदान नाकारल्यामुळे सरासरी ३४ लाख २९ हजार २00 रुपयांची दर महिन्याला बचत होत आहे; परंतु जिल्ह्यातील श्रीमंत लोकांची संख्या लक्षात घेता, यामध्ये मोठी वाढ होण्याची अपेक्षा आहे.