शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

नऊ लाख हेक्टर क्षेत्राला सूक्ष्म सिंचनची संजीवनी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2019 14:47 IST

सुमारे नऊ लाख हेक्टर क्षेत्रावर सूक्ष्म सिंचन संचांची उभारणी केल्याने ११ लाख शेतकºयांना मदत झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: सूक्ष्म सिंचन योजनेची प्रक्रिया आॅनलाइन झाली असून, या योजनेमुळे लाखो हेक्टरवरील क्षेत्राला संजीवनी मिळाली आहे. राज्यात गेल्या पाच वर्षात सूक्ष्म सिंचन योजना प्रभावी आणि पारदर्शकपणे राबविल्याने सुमारे ११ लाख शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावण्यास मदत झाली आहे. या योजनेमुळे सुमारे नऊ लाख हेक्टर क्षेत्र सूक्ष्म सिंचनाखाली आले आहे.सूक्ष्म सिंचन योजना अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावी आणि त्यांचा सहभाग त्यात वाढावा, यासाठी गेल्या काही वर्षात विविध उपाययोजना करण्यात आल्या. त्यामध्ये शेतकºयांनी या योजनेसाठी अर्ज करताना सोबत जोडण्यात येणाºया कागदपत्रांची संख्या २४ वरुन नऊ वर करण्यात आली. यामुळे प्रशासकीय गतीमानता येतानाच अर्ज मान्यतेचे प्रमाण वाढले आहे. कृषी विभागाच्या माध्यमातून शेतकºयांना डिजिटल प्लॅटफॉर्मवर आणण्यासाठी पुढाकार घेण्यात आला आहे. या योजनेच्या प्रत्येक टप्प्यावरील कार्यवाहीबाबत लाभार्थी शेतकºयाच्या मोबाइलवर एसएमएसद्वारे माहिती कळविली जाते. या योजनेच्या पूर्व संमतीचा ३० दिवसांचा कालावधी संपल्यानंतर देखील नव्याने अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. २०१४ पासून सुमारे नऊ लाख हेक्टर क्षेत्रावर सूक्ष्म सिंचन संचांची उभारणी केल्याने ११ लाख शेतकºयांना मदत झाली आहे. ई-ठिबकचा आधारसूक्ष्म सिंचन या योजनेकरीता अर्ज स्वीकृतीसाठी ‘ई-ठिबक’ ही आॅनलाइन प्रणाली तयार करण्यात आली आहे. योजनेसाठी आॅनलाईन नोंदणीची सुविधा करण्यात आली आहे. त्यामुळे ‘नोंदणी ते अनुदान’ वितरणाची संपूर्ण प्रक्रिया संगणकीय प्रणालीद्वारे होत असल्याने ई -ठिबकचा शेतकºयांना आधार मिळाला आहे.

नोंदणी प्रक्रिया सुरू४सूक्ष्म सिंचन योजनेचा लाभ घेण्याकरीता २०१९-२० या आर्थिक वर्षासाठी लाभार्थी नोंदणी व अनुदानासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आलेली आहे. यामध्ये ज्या शेतकºयांनी २०१७-१८ व २०१८-१९ या वर्षामध्ये नोंदणी केली आहे, त्यांना आता नोंदणी करण्याची आवश्यकता नाही, अशा सुचना कृषी विभागाच्या ई-ठिबक प्रणालीवरून देण्यात आल्या आहेत.

टॅग्स :buldhanaबुलडाणाagricultureशेतीIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प