शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

महसूल प्रशासनाकडून मलकापूर तालुक्यात हेलीपॅडसाठी जागेची पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2018 12:20 IST

मलकापूर तालुक्यातील हेलीपॅड करिता लागणारी जागा निश्चितीकरिता स्थानिक महसूल प्रशासनाने दसरखेड एमआयडीसी परिक्षेत्रात अ‍ॅमेनिटी स्पेसची पाहणी केली असून त्यासंदर्भातील प्रस्ताव लवकरच जिल्हाधिकारी बुलढाणा यांचेकडे सादर होणार आहे.

ठळक मुद्देदसरखेड एमआयडीसी परिक्षेत्रात अ‍ॅमेनिटी स्पेसची केली पाहणीलवकरच जिल्हाधिकाऱ्यांना सादर करणारा प्रस्ताव

मनोज पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्कमलकापूर : आपत्ती व्यवस्थापनांतर्गत सुरक्षेच्या दृष्टीने पुरामध्ये अथवा अन्य आपत्तीमध्ये अडकलेल्या व्यक्तींच्या बचावासाठी प्रत्येक तालुका मुख्यालयाच्या ठिकाणी कायमस्वरुपी हेलीपॅड निर्मितीचे कार्य  जिल्हा प्रशासनाने हाती घेतले आहे. त्या अनुषंगाने मलकापूर तालुक्यातील हेलीपॅड करिता लागणारी जागा निश्चितीकरिता स्थानिक महसूल प्रशासनाने दसरखेड एमआयडीसी परिक्षेत्रात अ‍ॅमेनिटी स्पेसची पाहणी केली असून त्यासंदर्भातील प्रस्ताव लवकरच जिल्हाधिकारी बुलढाणा यांचेकडे सादर होणार आहे.महसूल व वनविभाग मदत व पुनर्वसन मंत्रालयाच्या वतीने १७ नोव्हेंबर २०१७ शासन निर्णयानुसार आपत्ती व्यवस्थापनाअंतर्गत जिल्ह्यातील बुलढाणा, चिखली, देऊळगाव राजा, सिंदखेड राजा, लोणार, मेहकर, खामगाव, शेगाव, संग्रामपूर, जळगाव जामोद, नांदुरा, मलकापूर व मोताळा या प्रत्येक तालुका मुख्यालयाच्या ठिकाणी कायम स्वरुपी हेलीपॅड बांधण्याबाबत धोरण आखण्यात आले आहे. सुरक्षेच्या दृष्टीने पुरामध्ये किंवा अन्य आपत्तीमध्ये अडकलेल्या व्यक्तींच्या बचावासाठी प्रत्येक तालुका मुख्यालयाच्या ठिकाणी कायम स्वरुपी हेलीपॅड तयार करण्याची आवश्यकता असल्याची बाब त्या धोरणात प्रकर्षाने नमुद करण्यात आली आहे.यामध्ये पुरुष मुख्यालयास जागा निश्चीत करणे हेलीपॅडचे लॅडींग व टेकींग आॅफच्या दृष्टीकोनातुन हेलीपॅड बांधण्यासाठी कायमस्वरुपी सुरक्षित जागा शोधणे व भविष्यात तेथून एचटीएल किंवा अन्य कोणतेही अडथळे येणार नाही याची खात्री करणे या सारखे आदेश व सुचना जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यातील प्रत्येक तहसिलदार यांना दिले आहेत. त्या अनुषंगाने तहसिलदार विजय पाटील यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता, अधिकारी, मंडळ अधिकारी, तलाठी एम.आय.डी.सी.चे स्थानिक अधिकारी यांना सोबत घेऊन दसरखेड एमआयडीसी परिसरातील अ‍ॅमेनिटी स्पेसची पाहणी केली असून त्यासंदर्भात प्रस्ताव लवकरच तयार होऊन जिल्हाधिकारी यांचेकडे सादर करण्यात येणार आहे

टॅग्स :khamgaonखामगावState Governmentराज्य सरकार