शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
4
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
5
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
6
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
7
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
8
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
9
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
10
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
11
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
12
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
13
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
14
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
15
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
16
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
17
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
18
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
19
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
20
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...

चारा छावण्यांसाठी प्रशासनाची माघार; गुरांवर उपासमार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2019 17:37 IST

चारा टंचाईमुळे पशुपालक चिंताग्रस्त झालेले असतानाही आतापर्यंत चारा छावणीसाठी एकही प्रस्ताव तालुका स्तरावरून आलेला नाही.

- ब्रम्हानंद जाधव

बुलडाणा: जिल्ह्यात दुष्काळाची तिव्रता वाढली असून, दुष्काळी भागात जनावरांसाठी आवश्यक तेथे चारा छावण्या सुरू करण्याचे अधिकार जिल्हाधिकाºयांना दिले आहेत. त्यासाठी तालुका स्तरावर समिती सुद्धा नेमण्यात आलेली आहे. परंतू चारा टंचाईमुळे पशुपालक चिंताग्रस्त झालेले असतानाही आतापर्यंत चारा छावणीसाठी एकही प्रस्ताव तालुका स्तरावरून आलेला नाही. त्यामुळे जिल्ह्यात चारा छावण्यांसाठी प्रशासनाची माघार, जनावरांवर उपासमार असे चित्र दिसून येत आहे. जिल्ह्यात दुष्काळाची दाहकता वाढतच असून, पाण्यापाठोपाठ चाºयाचीही टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे पशुधन जगविणे शेतकºयांना अवघड झाले आहे.  जिल्ह्यामधील सर्वाधिक दुष्काळाच्या झळा बसत असलेल्या भागातही अद्याप    चारा सुरू करण्यात आल्या नाहीत. शासनाने जनावरांसाठी चारा छावण्या सुरू करण्याबाबत काही दिवसांपूर्वीच आदेश काढले अरहेत. तसेच जिल्हाधिकाºयांना चारा छावणी सुरू करण्यासाठीचे अधिकार देण्यात आलेले आहेत. तरी प्रत्यक्षात जिल्ह्यात तुर्तास टंचाई नसल्याचे सांगुन चारा छावण्या सुरू करण्यास प्रशासनाकडून दिरंगाई होत असल्याचे दिसून येते. मात्र प्रामुख्याने मे अखरे जिल्ह्यात चाराटंचाईची स्थिती निर्माण होण्याची साधार भीती पाहता  जिल्हा पशुसंवर्धन विभागाने संभाव्य स्थितीला तोंड देण्यासाठी आधीच उपरोक्त नियोजन करून ठेवले आहे.  यासंदर्भात ३१ जानेवारी रोजीच जिल्हा प्रशासनाने बैठक घेऊन त्यात जिल्हाधिकारी डॉ. निरुपमा डांगे यांनी संबंधीत विभागांना सुचना देऊन अनुषंगीक कार्यवाही करण्याचे निर्देश दिले होते. यामध्ये तालुकास्तरीय समितीचे तातडीने गठन करण्यात येऊन तालुका पशुधन विकास अधिकारी यांना मुख्यालयी राहण्याबाबत निर्देशीत केल्या गेले आहे. सोबतच कृषी विभाग, ग्राम विकास अधिकारी, तलाठी यांनी आपसी समन्वय ठेवून चारा उपलब्धतेची माहिती गाव निहाय भेटी देऊन संकलीत करण्याच्या दिलेल्या सुचनेनुसार आता मंडळ निहाय आराखडा तयार केला आहे. जिल्ह्यात एक लाख ११ हजार ७५७ मेट्रीक टन चाºयाची टंचाई निर्माण होण्याची शक्यता दाखवून त्यानुषंगाने हे नियोजन दोन महिन्यापूर्वी सुरू होते. मात्र आतापर्यंत चारा टंचाईच्या अनुषंगाने तालुका स्तरावर नेमण्यात आलेल्या गटविकास अधिकारी, उपविभागीय अधिकारी व तालुका कृषी अधिकाºयांच्या समितीकडून एकही प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे आला नाही. त्यामुळे चारा छावण्या सुरू करण्यास होणारा विलंब गुरांसाठी उपासमारी व पशुपालकांसाठी चिंतेची बाब ठरत आहे. 

 असा लागतो दिवसाला चाराजिल्ह्यात लहान गुरांची संख्या ६४ हजार ४३७ असून मोठ्या गुरांची संख्या पाच लाख ९५ हजार ५४९ असून शेळी व मेंढी मिळून चार लाख १२ हजार ८४१ असे एूकण दहा लाख ७२ हजार ९२७ गुरे जिल्ह्यात आहेत. यामध्ये टंचाई काळात लहान  गुरांसाठी तीन किलो तर मोठ्या गुरांसाठी सहा किलो आणि शेळ््या मेंठ्यांसाठी ६०० ग्रॅम वाळलेला चारा प्रतिदीन लागतो. प्रस्तावित १८ छावण्यालाही मिळेना मुहूर्त जिल्ह्यातील ९० मंडळामध्ये टंचाईच्या दृष्टीकोणातून एकूण १८ चारा छावण्या उभारण्याचे प्रशासनाने दोन महिन्यापूर्वीच नियोजन केले होते. त्यासाठी जवळपास दोन कोटी ५८ लाख रुपये खर्च अपेक्षीत आहे. परंतू मे महिना उजाडला असतानाही प्रस्तावित १८ चारा छावण्या सुरू करण्यासाठी अद्यापही मुहूर्त मिळाला नाही.  चारा चाछवण्या सुरू करण्याबाबत अद्याप प्रस्ताव आलेला नाही. चारा छावण्या सुरू करण्यासाठी तालुका स्तरावर समिती नेमण्यात आलेली आहे. या समितीकडून जिल्ह्यात किती जनावरे आहेत, किती चारा उपलब्ध आहे, याचा सर्व आढावा घेऊन तो प्रस्ताव जिल्हाधिकाºयांना पाठविण्यात येतो. त्यानंतर चारा छावणी सुरू केल्या जाते. - डॉ. पी. जी. बोरकर, जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त बुलडाणा.

टॅग्स :buldhanaबुलडाणा