शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
4
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
5
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
6
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
7
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
8
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
9
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
10
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
11
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
12
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
13
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
16
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
17
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
18
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
19
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
20
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?

ग्रामीण भागातील निकाल वाढला!

By admin | Updated: May 31, 2017 00:25 IST

बुलडाणा तालुक्याचा ९२.२९ टक्के निकाल: चार विद्यालय अव्वल

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या १२ वीच्या परीक्षेचा निकाल ३० मे रोजी दुपारी १ वाजता आॅनलाइन पद्धतीने जाहीर करण्यात आला असून, यामध्ये बुलडाणा तालुक्याच्या निकालाची एकूण टक्केवारी ९२.२९ इतकी आहे. यावर्षी ग्रामीण भागाचा निकाल वाढला आहे. तालुक्यातील एकूण ४५ शाळा व माध्यमिक विद्यालयांपैकी विद्या विकास विद्यालय, कोलवड, सहकार विद्यामंदिर, बुलडाणा, सरस्वती हायस्कूल, सुंदरखेड व अंजुमन उर्दू गर्ल ज्यू.कॉलेज धाड या शाळेचा १०० टक्के निकाल लागला असून, देऊळघाट येथील उर्दू आर्ट अ‍ॅण्ड सायन्स कॉलेजचा शून्य टक्के निकाल लागला आहे. बुलडाणा तालुक्यातून यावर्षी ३ हजार ८५७ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यात २२१७ मुले तर ३८५७ मुली होत्या. परीक्षा देणाऱ्या ३ हजार ८५४ विद्यार्थ्यांमध्ये २२१६ मुले तर १६३८ मुली होत्या. त्यापैकी ३५५७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, त्यात २००५ मुले तर ३५५७ मुली आहेत. मुलांच्या पास होण्याची टक्केवारी ९०.४८ असून, मुलींची पास होण्याची टक्केवारी ९४.७५ आहे. अशा प्रकारे तालुक्याचा एकूण ९२.२९ टक्के निकाल लागला आहे. यावर्षी शाळानिहाय निकाल असा घोषित झाला. झेड.पी.ज्यूनिअर कॉलेज बुलडाणा ७९.८०, श्री शिवाजी ज्यू. कॉलेज बुलडाणा ९७.९७, जिजामाता कॉलेज बुलडाणा ८४.६१, झेड.पी.ज्यू.कॉलेज पाडळी ९४.२८, एडेड ज्यू.कॉलेज ९४.२३, प्रबोधन ज्यू.कॉलेज ८२.५५, शारदा ज्ञानपीठ ९८.२१, शिवाजी ज्यू.कॉलेज चांडोळ ९४.०५, झेड.पी.ज्यू. कॉलेज देऊळघाट ९४.५६, उर्दू ज्यू.कॉलेज बुलडाणा ८७.०३, जनता उच्च माध्यमिक स्कूल पिं.सराई ८६.८८, भारत विद्यालय बुलडाणा ९८.६७, विद्या विकास विद्यालय १००, श्री चक्रधर स्वामी विद्यालय मढ ९८.१४, संभाजी राजे ज्यू. कॉलेज डोंगरखंडाळा ९१.५६ टक्के निकाल लागला, तर शरद पवार विद्यालय पांगरी उबरहंडे ९७.१८, मौलाना आझाद उर्दू हायस्कूल धाड ९६.०६, शरद पवार ज्यू.कॉलेज वरूड ८८.७३, महात्मा जोतिबा फुले हायस्कूल नांद्राकोळी ८४.४४, सहकार विद्या मंदिर बुलडाणा १००, भास्करराव शिंगणे विद्यालय चौथा ८३.३३, जिजामाता हायस्कूल दुधा ९८.०८, सरस्वती विद्यालय सुंदरखेड १००, राजर्षी शाहू ज्यू. कॉलेज म्हसला ९२.१४, राजर्षी शाहू ज्यू.कॉलेज धाड ९४.८४, राजीव गांधी मिल्ट्री स्कूल कोलवड ९४.२०, विवेकानंद उच्च माध्य.विद्यालय सव ९४.२३, राजे छत्रपती ज्यू.कॉलेज रामनगर ५०, सहकार ज्यू. कॉलेज धाड ८७.५०, वंदे भारती ज्यू. कॉलेज धाड ९८.६६, महाराणा प्रताप ज्यू. कॉलेज धाड ९७.८७, आदिवासी आश्रमशाळा येळगाव ९४.११, राजर्षी शाहू ज्यू. कॉलेज दे.घाट ९५.८९, संत गाडगेबाबा ज्यू. कॉलेज साखळी ९८.७१, आर्ट, कॉमर्स कॉलेज रायपूर ८२.४५, उर्दू आर्ट स्कूल दे.घाट ०, शरद पवार उर्दू हायस्कूल चांडोळ ८४.८४, राजर्षी शाहू महाराज ज्यू.कॉलेज माळविहीर ९१.८९ टक्के, शिवसाई उच्च माध्यमिक विद्यालय मासरूळ ९७.५६, अंजुमन उर्दू गर्ल कनिष्ठ महाविद्यालय, धाड १००, ज्ञानराव बापू दांडगे कनिष्ठ महाविद्याल, धाड ९०, श्री शिवाजी ज्यूनिअर कॉलेज बुलडाणा ८२.५८, जिजामाता महाविद्यालय बुलडाणा ७३.३३ तसेच गोविंदराव जाधव ज्यूनिअर कॉलेज, सुंदरखेड ४४.४४ टक्के निकाल लागला आहे. यंदा तालुक्याचा निकाल वाढलाबुलडाणा तालुक्यातून गत वर्षी ३२४८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले त्यात १८५९ मुले तर १३८९ मुली होत्या. मुलांची टक्केवारी ८७.४८ तर मुलींची टक्केवारी ९१.९९ होती.हा निकाल ८९.३५ टक्के घोषित झाला होता; मात्र यंदा तालुक्याचा निकाल वाढला असून, ९२.२९ टक्के निकाल लागला.