शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

१४ व्या वित्त आयोगाच्या खर्चावरील बंधने शिथिल!

By admin | Updated: March 19, 2016 00:44 IST

‘सीईओ’ यांचे निर्देश; बीडीओंच्या परवानगीची गरज नाही.

बुलडाणा : पंचायतराज व्यवस्था अधिक बळकट व्हावी म्हणून केंद्र शासनाने १४ व्या वित्त आयोगाचा निधी थेट ग्रामपंचायतींना वितरित करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार बुलडाण्यासह राज्यभरातील ग्रामपंचायतींच्या खात्यात निधी वळता करण्यात आला असून, बुलडाण्यात मात्र जिल्हा परिषदेने हा निधी खर्च करण्यासाठी गटविकास अधिकार्‍यांच्या परवानगीची अट टाकली होती. यासंदर्भात ह्यलोकमतह्ण ने १६ मार्च रोजी वृत्त प्रकाशित करताच सरपंच, उपसरपंच संघटनांनी आमसभेवर बहिष्कार टाकण्याचा पवित्रा घेतला. यानंतर जिल्हा परिषद प्रशासन जागे झाले व अखेर १८ मार्च रोजी या निधीवरील बंधने मागे घेत असल्याचे पत्र मुख्य कार्यपालन अधिकारी दीपा मुधोळ यांनी सर्व गटविकास अधिकार्‍यांना दिले आहे.सरपंच व ग्रामसचिवाच्या सहीने ग्रामपंचायतच्या खात्याचे व्यवहार होतात; मात्र हा निधी खर्च करण्यासाठी गटविकास अधिकार्‍याचेही परवानगी पत्र घेण्याबाबत सूचना जिल्हा परिषदेने केल्या होत्या. विशेष म्हणजे या पत्रात ग्रामपंचायतकडून या निधीमध्ये अनियमितता होणार असल्याचे कारण दाखवित एकप्रकारे ग्रामपंचायतच्या व्यवहारांवरच संशय निर्माण केला होता. या पत्रानुसार मग गटविकास अधिकार्‍यांनी सर्व बँकांना आपल्या स्तरावरून पत्र पाठवून ग्रामपंचायतच्या खात्यातील निधी काढण्यापूर्वी गटविकास अधिकार्‍यांच्या परवानगीचे पत्र तपासावे, अशा सूचना दिल्या, तसेच गटविकास अधिकार्‍यांच्या सहीचे नमुनेही बँकांना पाठवून ग्रा.पं.ची स्वायत्तता धोक्यात आणली होती. १४ व्या वित्त आयोगाचा निधी खर्च करण्याचा अधिकार हा ग्रामपंचायतला दिला असून, शासनाने त्या खर्चाबाबत निश्‍चित अशी नियमावलीपण दिली आहे; मात्र त्या नियमांमध्ये केवळ बुलडाणा जिल्हा परिषदेने भर टाकून हा निधी खर्च करण्याबाबत ग्रामपंचायतीवर बंधने टाकली असल्याने सरपंच संघटना आक्रमक झाली व त्यांनीही बहिष्काराचे अस्त्र उगारल्याने अखेर जिल्हा परिषद प्रशासन नमले व सदर पत्र मागे घेतले आहे.