खामगाव: शहरातील साथ रोग आटोक्यात आणण्यासाठी शहराच्या विविध भागातील वस्त्यांमध्ये फॉगीग मशीनद्वारे धुरळणी केल्या जात आहे. पालिका प्रशासनाने गेल्या काही दिवसांपासून धुरळणीचे काम युद्धपातळीवर हाती घेतले आहे.वातावरणातील बदलामुळे शहरात विविध साथजन्य आजाराचा प्रकोप वाढला आहे. ऐन सणासुदीच्या दिवसांत किटकजन्य आजाराच्या प्रकोपापासून बचाव करण्यासाठी पालिकेतेने स्वच्छता मोहिम हाती घेतली आहे. शहरातील ८ प्रभागाअंतर्गत येत असलेल्या सर्वच ३२ वार्डात स्वच्छता मोहिम राबविल्या जात असून प्रमुख रस्त्यांसह गल्लीबोळीत फॉगीग मशीनद्वारे धुरळणी केल्या जात आहे. नवरात्रांमध्ये नागरिकांना स्वच्छेते विषयी कुठलीही समस्या जाणवणार नाही, अशी खबरदारी नगर पालिका मुख्याधिकारी डी.ई.नामवाड यांच्या मार्गदर्शनात आरोग्य विभागाकडून घेतल्या जात आहे. सद्य परिस्थितीत सकाळ-संध्याकाळ दोन वेळा धुरळणी करण्यात येत आहे. यासाठी पालिका प्रशासन दोन मशीनचा वापर करीत असून नवरात्रोत्सवात आणखी काही मशीन वाढविण्यात येणार असल्याची माहिती आहे.
नवरात्रोत्सवापूर्वी स्वच्छतेचा संकल्प
By admin | Updated: September 19, 2014 00:36 IST