शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

जलाशयांनी गाठला तळ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2016 02:26 IST

मोठे, मध्यम व लघू प्रकल्प : सरासरी ९.४0 टक्के जलसाठा शिल्लक.

बुलडाणा : मागील तीन वर्षांपासून जिल्ह्यात पावसाचे प्रमाण अत्यंत कमी झाले आहे. यंदाही जिल्ह्यात सुरुवातीला चांगला पाऊस आला; मात्र पावसाने जिल्ह्याकडे पाठ फिरविल्यामुळे आज रोजी जिल्ह्याला पाणीपुरवठा करणार्‍या जिल्ह्याखालील ९१ जलाशयात केवळ 0९.४0 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. जवळपास सर्वच जलाशयांनी तळ गाठला आहे. परिणामी, उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच जिल्ह्यावर जलसंकट उभे ठाकले आहे. तीन मोठे प्रकल्प आणि सात मध्यम आणि ७४ लघू प्रकल्पात या प्रकल्पातील पाणीसाठा आता झपाट्याने कमी होत आहे. पिण्यासाठी आणि शेतीसाठी वर्षभर या प्रकल्पामधून पाणी वापरण्यात येते. त्यामुळे पावसाच्या सुरुवातीला भरलेली ही जलाशये मार्चपर्यत तळ गाठते. शिवाय मार्च अखेरपासून तापमानामध्ये वाढ होत असल्यामुळे पाण्याचे बाष्पीभवन मोठय़ा प्रमाणात होते. यामुळे जलपातळीत कमालीची घट आढळून आली आहे. नळगंगा, पेनटाकळी व खडकपूर्णा या मोठे प्रकल्पात सरासरी १0.२८ टक्के, पलढग, ज्ञानगंगा, मस, कोराडी, मन, तोरणा व उतावळी या मध्यम प्रकल्पात सरासरी 0४.९0 टक्के इतका जलसाठा आहे. उर्वरित ७४ लघू प्रकल्पामध्ये केवळ 0५.६९ टक्के इतकेच पाणी शिल्लक आहे. पाणी टंचाईची झळ ही खर्‍या अर्थाने लघू प्रकल्प कोरडे झाल्यानेच जाणवत आहे. वन्यप्राणी, पाळीव प्राणी यांना पिण्यासाठी लघू प्रकल्पाचाच आधार घ्यावा लागतो. शिवाय या प्रकल्पातील पाण्याचा वापर हा प्रामुख्याने लोकवस्तीत पिण्यासाठी मोठय़ा प्रमाणात केला जातो. परिणामी लघु प्रकल्प आटल्यामुळे नागरिकांस वनप्राण्यांनाही याचा फटका जणवत आहे. मोठे व माध्य. प्रकल्पात मोठय़ा पाणीपुरवठा योजना कार्यान्वित असून, धरणातील जलस्तर घटल्याने येत्या उन्हाळ्याच्या तीन महिन्यात जिल्ह्यातील शहर आणि ग्रामीण भागात पाणीबाणी आणखी गंभीर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.