शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

धरणांमधील जलसाठय़ात वाढ!

By admin | Updated: September 29, 2016 01:38 IST

नळगंगा, पेनटाकळी, खडकपुर्णा या मोठय़ा प्रकल्पामधील जलपातळीत वाढ झाली आहे.

बुलडाणा, दि. २८- शहरासह परिसरात परतीच्या पावसाने दमदार हजेरी लावली त्यामुळे परिसरातील नदी, नाल्यांना पूर येवून नळगंगा, पेनटाकळी, खडकपुर्णा या मोठय़ा प्रकल्पामधील जलपातळीत वाढ झाली आहे. योबतच मध्यम प्रकल्प असलेले येळगाव धरण ओव्हरफ्लो झाले. त्यामुळे भविष्यातील दोन वर्षाची पाणीटंचाईची चिंता मिटली आहे. बुलडाणा शहर व परिसरातील काही गावांना येळगाव धरणातून पाण्याचा पुरवठा होतो. मागिल काही वर्षापासून कमी पावसामुळे येळगाव धरणात अल्प जलसाठा येत होता. त्यामुळे बुलडाणा शहरासह इतर गावांना उन्हाळ्यात तिव्र पाणीटंचाईच्या झळा बसत होत्या. बुलडाणा शहर व परिसरातील काही ग्रामीण भागात नगरपालिकेव्दारे ८0 हजार लोकसंख्येच्या वस्तीला पाणी पुरवठा करण्यात येतो. यासाठी शहर परिसरातील येळगाव धरणातून जलशुध्दीकरण केंद्र व या केंद्रातून शहरातील जलकुंभात पाणी येते. या जलकुंभातून शहर परिसरात दुसर्‍या दिवशी पाणी पुरवठा करण्यात येत आहे. मात्र मागिल वर्षापासून परिस्थिती बदलली होती. मागिल वर्षी झालेल्या पावसामुळे धरण १00 टक्के भरले होते. त्यामुळे गेल्या उन्हाळ्यात पाणीटंचाई जाणवली नाही. आजही शहरात एका दिवसाआड पाणी मुबलक प्रमाणात पाणी येत आहे. मात्र येत्या उन्हाळ्यात पाणीटंचाई जाणवू नये म्हणून येळगाव धरणात मुबलक प्रमाणात जलसाठा होणे आवश्यक होते. दरम्यान शुक्रवारी रात्री, शनिवारी, बुधवारी पावसाने दमदार हजेरी लावली. त्यामुळे परिसरातील नाल्यांना पूर आला. देऊळघाट येथून वाहणार्‍या पैनगंगा नदीला पूर आला. त्यामुळे येळगाव धरणात १२.४0 द.ल.घ.मी. म्हणजे १00 टक्के जलसाठा आला व आता धरण ओव्हरफ्लो झाले. त्यानंतर पाण्याचा वेग कमी झाल्यामुळे येळगाव धरणाचे दरवाजे उघडण्यात आले नाही. धरण १00 टक्के भरल्यामुळे येणार्‍या उन्हाळ्यात पाणीटंचाई जाणवणार नसून बुलडाणासह परिसरातील गावांची चिंता मिटली आहे. दोन दिवसाच्या दमदार पावसाचा परिणामबुलडाणा शहरासह ग्रामीण भागाला पाणी पुरवठा करणार्‍या येळगाव धरणात पाणीसाठय़ाची क्षमता १२.४0 द. ल. घ. मी. आहे. मागिल वर्षी पावसाळ्यात धरण १00 टक्के भरले होते. त्यामुळे उन्हाळ्यात पाणीटंचाई जाणवली नाही. पावसाळ्यापूर्वी धरणात 0.९0 द.ल.घ.मी. जलसाठा होता. मात्र शुक्रवार व शनिवार रात्रीसह आतापर्यंंत झालेल्या दमदार पावसामुळे धरणात पुन्हा १२.४0 द.ल.घ.मी जलसाठा आला आला आहे.