शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

खामगावातील १०० कोटींच्या भुखंडावर लोकप्रतिनिधींचा डोळा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2020 16:05 IST

याप्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी काँग्रेस आणि मित्र पक्षाच्या नगरसेवकांनी केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: स्थानिक नगर पालिकेची १७ फेब्रुवारी सर्वसाधारण सभा आयोजित केली आहे. या सभेत बिर्ला अ‍ॅग्रो कॉटसीन इंडियाचा भाडेपट्टा नुतनीकरण करण्यासंदर्भातील विषय सभेच्या विषय सुचीवर ठेवण्यात आला आहे. १०० कोटी रुपयांची मालमत्ता असलेल्या या जमीनीचे लचके तोडण्याचा स्थानिक लोकप्रतिनिधींचा डाव आहे. यामध्ये मुख्याधिकारी यांची भुमिका संशयास्पद असल्याने याप्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी काँग्रेस आणि मित्र पक्षाच्या नगरसेवकांनी केली आहे.सोमवारी सायंकाळी ५ वाजता माजी नगराध्यक्षा श्रीमती सरस्वतीताई खासने यांच्यासह कॉंग्रेस व मित्र पक्षाच्या नगरसेवकांनी बुलडाणा येथे जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांची भेट घेतली. बिर्ला कॉटसीन संदर्भात तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केली. यावेळी राष्ट्रवादीचे नगरसेवक देवेंद्र देशमुख, भारिपचे नगरसेवक विजय वानखडे, कॉंग्रेस नगरसेवक इब्राहिम खॉं सुभान खॉं, नगरसेवक अब्दुल रशीद अब्दुल लतीफ, नगरसेवक भूषण शिंदे उपस्थित होते.खामगाव नगर पालीकेच्या मालकीचा नझुल शिट नं.४१ अ भुमापन क्रं. १५, १६ व नझुल शिट नंबर ४१ सी भुमापन क्रं. ४ मधील बिर्ला अ‍ॅग्रो कॉटसीन इंडियाचा भाडेपटट नुतनीकरण संदर्भात नगर पालीकेच्या १७ फेब्रुवारी रोजीच्या सर्व साधारण सभेत विचार विनीमयासाठी ठेवण्यात आला आहे. सध्याच्या बाजार भावाप्रमाणे बिर्ला कॉटसीनची मालमत्ता ही जवळपास १०० कोटी पेक्षा जास्त रुपयांची आहे. ही जागा खामगांव शहराच्या मध्यस्थानी असून जागेच्या लगत बसस्थानक, रेल्वे स्टेशन, सामान्य रुग्णालय, शाळा, महाविद्यालय यासह इतर महत्वाच्या संस्था आहेत.प्रदिर्घ कालावधीपासून या जागेचा औद्योगिक वापर बंद झाल्यामुळे ही जागा रिकामी पडलेली आहे. नगर परिषदेने बिर्ला कॉटसीनला ज्या उदद्ेशाकरीता जागा लीजवर दिली होती तो उदद्ेश देखील राहिलेला नाही व लीज धारकाकडुन नगर परिषदेने अनेक वषार्पासून थकित भाडे सुध्दा वसुल केलेले नाही.असे असतांना १७ फेब्रुवारीच्या नगर परिषदेच्या सभेमध्ये बिर्ला कॉटसीनच्या जागेची लीज वाढवुन देण्याचा विषय राजकीय दबावाखाली सभेमध्ये ठेवण्यात आला आहे. असा आरोप करण्यात आला आहे. बिर्ला कॉटसीन संदर्भातील कोणतीही गैरकायदेशीर टिप्पणी दिलेली नाही. कायदेशीर बाबी गृहीत धरूनच टिप्पणी तयार केली आहे. बिर्ला कॉटसीन संदर्भातील विषयाला मान्यता द्यायची अथवा नाही, हा अधिकार सभेचा आहे.- धनंजय बोरीकरमुख्याधिकारी, नगर परिषद

टॅग्स :buldhanaबुलडाणाkhamgaonखामगाव