चिखली (जि. बुलडाणा): लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या आदिशक्ती आई रेणुका देवी यात्रा महोत्सव दरवर्षाप्रमाणे यावर्षी चैत्रपौर्णिमा ४ एप्रिल रोजी साजरा होत आहे. यानिमित्ताने शहरात सर्वत्र उत्साह व भक्तीमय वातावरण पाहावयास मिळत आहे. यानुषंगाने ङ्म्री रेणुकादेवी संस्थान व ङ्म्री बचानंद स्वामी संस्थानच्यावतीने वासंतिक नवरात्रोत्सवास सुरूवात झाली असून, सुमारे दीडशे वर्षांची परंपरा असलेली रेणुका देवी वहन मिरवणुकीची आस भाविकांना लागली आहे. दरवर्षी मोठय़ा उत्साहात भरणार्या या यात्रेचे आकर्षण तालुक्यासह परिसरातील गावखेड्यांनाही असते. रेणुकादेवीचे मंदिर हे शहराच्या मध्यभागी असून, मंदिराचा उंच कळस शहराच्या वैभवात भर घालून देतो. पौराणिक काळापासून रेणुकादेवीचे मूळस्थान चिखली हे असून, आदिशक्तीचे सर्वश्रेष्ठ शक्तीपीठ म्हणून सर्वत्र प्रसिद्ध आहे. महान तपस्वी बचानंद महाराज यांच्यानंतर त्यांच्या शिष्यानीही मंदिराचे काम पाहिले. कालांतराने मंदिराच्या व्यवस्थापनासाठी विश्वस्त मंडळाची नेमणूक झाली. तेव्हापासून अविरतपणे विश्वस्त मंडळामार्फत दरवर्षी वासंतिक नवरात्रोत्सवानिमित्त यात्रा महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. यानुषंगाने रेणुका देवी मंदिरात घटस्थापना झाली असून दररोज भजन, आरती, गीतापठण सुरू आहे, तसेच सकाळ, संध्याकाळ आरती, नामस्मरण आदी कार्यक्रम भक्तीपूर्ण वातावरणात पार पडत आहेत. ३ एप्रिलच्या सायंकाळी गळकरी, वगदी पूजन, झेंडा मिरवणूक, भंदे मिरवणूक काढण्यात येणार आहे. तर चैत्रपौर्णिमा ४ एप्रिल रोजी रेणुकादेवीला प्रात:काळी अभिषेक व नवरात्र उत्थापन, शेलुदवासीयांचे मानाचे पातळ, खण, गळकरी वगदी प्रदक्षिणा, नवसपूर्ती झेंडा मिरवणूक, ऑटोरिक्षा, टॅक्सी, बियाणे महामंडळ, बाजार समिती, अड त, हमाल, एस.टी.आगार आदी संघटनांच्यावतीने झेंडा मिरवणुकीसह खण पातळ अर्पण, वाहनावरील देवीला पातळ व खण अर्पण, चर्मकार बंधू-भगिनींची चित्तथरारक जिव्हा त्रिशुलधारी मिरवणुकीसह नवसपूर्ती व दिवसभर शहरातील विविध पतसंस्था, बँक, मित्रमंडळ, गणेश मंडळ, व्यापारी संघटनांकडून ठिकठिकाणी प्रसादाचे वितरण तर रात्री या यात्रेचे मुख्य आकर्षण आई रेणुकादेवीच्या अष्टभूजा प्रतिमेची भव्य (वहन) मिरवणूक निघणार आहे.
रेणुकादेवी वासंतिक नवरात्रोत्सवास प्रारंभ
By admin | Updated: April 2, 2015 01:54 IST