शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

अहमदनगर येथे अडकलेल्या खामगावातील ५१ मजुरांना दिलासा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2020 16:27 IST

अहमद नगर येथील एका ट्रॅव्हल्सच्या तीन बसेसद्वारे हे कामगार दुपारी २.३० वाजता खामगावच्या दिशेने रवाना झालेत.

- अनिल गवईलोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: कोरोना विषाणू संक्रमनामुळे  अहमदनगर येथील मिल्ट्री कॅम्पमध्ये अडकून पडलेल्या खामगावातील मजुरांचा स्वगृही परतण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. खामगावातील ५१ मजूर अहमदनगर मध्ये अडकून पडल्याचे वृत्त सर्वप्रथम ‘लोकमत’ने प्रकाशित केले. त्यानंतर या वृत्ताची दखल घेत अडकलेल्या मजुरांना स्वगृही आणण्यासासाठी प्रयत्न करण्यात आले. हे येथे उल्लेखनिय!खामगाव तालुक्यातील ५१ मजूर अहमद नगर येथील दरेवाडी मिल्ट्री कॅम्प, एमआयडीसी गेट नं.३ परिसरात गत ४५ दिवसांपासून अडकून पडले होते. जवळची सर्वच संसाधने संपल्यानंतर ‘आम्हाला घरी पोहोचवा अशी आर्त हाक’ या मजूरांकडून दिली जात असतानाच, ‘लोकमत’ने ११ मे   २०२० रोजीच्या अंकात पहिल्या पानावर ‘खामगाव तालुक्यातील ५१ मजूर अहमदनगरमध्ये अडकले’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले. या वृत्ताची लागलीच दखल घेत माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांनी जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधला. जिल्हा प्रशासनाकडून अहमद नगर येथील तहसीलदार उमेश पाटील यांच्याशी संपर्क साधण्यात आला. त्यानंतर जिल्हाधिकाºयांच्या विशेष परवानगीने या मजुरांच्या घरी येण्याचा मार्ग मोकळा झाला. अहमदनगरचे आमदार आणि भाजपनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी या मजुरांना आपल्या गावी पाठविण्यासाठी महत्वाची मदत केली. मिल्ट्री कॅम्प परिसरातील प्राथमिक आरोग्य केंद्रात सर्वच ५१ जणांची तपासणी पूर्ण केल्यानंतर अहमद नगर येथील एका ट्रॅव्हल्सच्या तीन बसेसद्वारे हे कामगार दुपारी २.३० वाजता खामगावच्या दिशेने रवाना झालेत. खामगाव येथे आल्यानंतरही या मजुरांची उपजिल्हा सामान्य रूग्णालयात तपासणी केली जाणार आहे. त्यानंतर या मजुरांना स्वगृही सोडण्यात येईल. आ. राधाकृष्ण विखे पाटील यांचे स्वीय सहाय्यक त्र्यंबक घुगरकर आणि खामगाव येथील प्रमोद महाजन यांची भूमिका याकामी महत्वाची ठरली.

 उप जिल्हाधिकारी गौरी सावंत यांची भूमिका ठरली महत्वाची!अहमद नगर येथे अडकून पडलेल्या मजुरांना स्वगृही आणण्यासाठी  माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांनी संपर्क केल्यानंतर उपजिल्हाधिकारी सावंत यांनी जिल्हाधिकारी आणि अहमद नगर येथील प्रशासनाशी संपर्क केला. त्यानंतर २६ पुरूष १६ महिला आणि ५ बालकांचा गावी येण्याचा मार्ग मोकळा झाला.

 सानंदांनी उचलला मजुरांच्या येण्याचा खर्च!प्रशासनाने मान्यता दिल्यानंतर अहमद नगर येथून खामगाव येथे या मजुरांना आणण्यासाठीचा संपूर्ण खर्च माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांनी उचलला. मंगळवारी अहमदनगर येथील कदम ट्रॅव्हल्सच्या बसेच्या भाड्यासाठी ५५ हजार रूपयांचा भरणा केला. त्यानंतर या बसेस अहमदनगर येथून दुपारी २:३० वाजता खामगावच्या दिशेने निघाल्या आहेत.

 अडकून पडलेल्या मजुरांना सहकार्य करण्याचे आवाहन काँग्रेस पक्षाच्या नेत्या सोनिया गांधी यांनी केले आहे. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत, अहमदनगर येथे अडकून पडलेल्या मजुरांना स्वगृही आणण्यासाठी मदत केली. ‘लोकमत’च्या वृत्तामुळे खामगाव तालुक्यातील मजूर अडकून पडल्याची माहिती मिळाली. त्यानंतर आपण पुढील प्रयत्न केले.- दिलीपकुमार सानंदामाजी आमदार, खामगाव. 

टॅग्स :khamgaonखामगावAhmednagarअहमदनगर