शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

ज्ञानगंगा अभयारण्यातील देव्हारी वनग्रामचे पुनर्वसन रखडले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 16:19 IST

Buldhana News एक वर्षाचा कालावधी उलटला असला तरी गावाच्या पूनर्वसनासंदर्भात हालचाली झालेल्या नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: टी-१ सी-१ वाघामुळे चर्चेत आलेल्या ज्ञानगंगा अभयारण्यात असलेल्या देव्हारी वनग्रामचे पुनर्वसन रखडले आहे. त्यातच गावाचे सर्वेक्षण होऊन सेक्शन ११ लावण्यात आले आहे. यास एक वर्षाचा कालावधी उलटला असला तरी गावाच्या पूनर्वसनासंदर्भात हालचाली झालेल्या नाही. त्यामुळे या गावात कुठलीही विकास कामेही करता येत नाही. त्यामुळे त्रस्त झालेल्या ग्रामस्थांनी ९ डिसेंबर रोजी थेट जिल्हाधिकारी कार्यालय गाठून गावाच्या पुनर्वसनाचा प्रश्न त्वरित मार्गी लावावा, अशी मागणी केली. विशेष म्हणजे या गावातील २० लाभार्थी हे रमाई आवास योजनेंतर्गत घरकुलासाठी पात्र असतानाही सेक्सन ११ लागू केल्याने या योजनेचा लाभ मिळण्यात लाभार्थ्यांना अडचणी येत आहेत. सोबतच गावात कुठलीही विकास कामे करता येत नाहीत. त्यामुळे एकतर गावाचे पुनर्वसन करा किंवा गावातील विकास कामे करण्यास परवानगी द्या, अशी मागणी ग्रामस्थांनी थेट जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे. यासंदर्भातील एक निवेदनही या ग्रामस्थांनी जिल्हा प्रशासनास दिले आहे. आम्रपाली हिवाळे, साधना हिवाळे , वंदना झिने, शशिकांत हिवाळे, श्रीकृष्ण हिवाळे, प्रशांत गवई, मिलिंद हिवाळे, नितेश जाधव, नितीन पवार यांच्यासह जवळपास ३५ जणांनी ही मागणी केली.

२९८ कुटुंबाचे पुनर्वसन गरजेचेदेव्हारी गावात गेल्या वर्षी सर्वेक्षणादरम्यान २९८ कुटंब असल्याचे स्पष्ट झाले होते. या कुटुंबाचे पुनर्वसन करण्यासाठी ५७ कोटी रुपयांची गरज आहे. त्यासंदर्भातील प्रस्ताव वरिष्ठ पातळीवर पाठविण्यात आला आहे; पण कोरोना संसर्गामुळे तथा अन्य प्रशासकीय तांत्रिक अडचणींमुळे अनुषंगिक निधी उपलब्ध झालेला नाही. त्यामुळे प्रलंबित पुनर्वसन व सेक्शन ११ लागू झाल्याने विकास कामांना मज्जाव अशा दुहेरी कात्रीत येथील ग्रामस्थ अडकलेले आहेत.

टॅग्स :dnyanganga abhayaranyaज्ञानगंगा अभयारण्यbuldhanaबुलडाणा