शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

पुनर्वसित गावातील सुविधा केवळ कागदोपत्रीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2020 15:54 IST

Khamgaon News पुनर्वसन  झालेल्या ठिकाणाचे स्थळ निरिक्षण करण्याची गरज निर्माण झाली आहे.

 - अनिल गवईलोकमत न्यूज नेटवर्क खामगाव:  निम्म ज्ञानगंगा प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रात गेल्याने खामगाव तालुक्यातील दिवठाणा या गावाचे पुनर्रवसन करण्यात आले. दिवठाणा येथील लाभार्थ्यांना काळेगाव रोडवर राहण्यासाठी भुखंड देण्यात आले. मात्र, याठिकाणी कोणत्याही मुलभूत सुविधा उपलब्ध न केल्यामुळे लाभार्थ्यांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. केवळ कागदोपत्री सुविधा देण्यात आल्याने पुनर्वसन  झालेल्या ठिकाणाचे स्थळ निरिक्षण करण्याची गरज निर्माण झाली आहे.निम्न ज्ञानगंगा-२ बृहत पाटबंधारे योजनेतंर्गत दिवठाणा येथील प्रभावित नागरिकांचे  काळेगाव रस्त्यावर पुनर्रवन करण्यात आले. मात्र, याठिकाणी मुलभूत सुविधांचा अभाव आहे. परिणामी, दिवठाणा येथील लाभार्थ्यांचा या ठिकाणी पुनर्रवसनास विरोध होत आहे. पाटबंधारे विभागाच्या सहाय्यक अभियंत्यांनी वरिष्ठ तसेच जिल्हा प्रशासनाची दिशाभूल करून लाभार्थ्यांच्या पुनर्रवसनाचा प्रयत्न केला आहे. लाभार्थ्यांची दिशाभूल करीत काही जणांना स्थलांतरीत केले आहे. या लाभार्थ्यांना मुलभूत समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे लाभार्थ्यांमध्ये संतापाची लाट उमटली आहे. 

लाभार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी!येथील अतिक्रमकांना ई-क्लास गट ६८ वरील भुखंडाचे हक्क/ ताबा सक्षम अधिकाºयांमार्फत देण्यात आल्याचे नमूद करण्यात आले. मात्र, प्रत्यक्षात याठिकाणी वीज, पथदिवे, रस्ते आणि पिण्याचे पाणीही उपलब्ध नाही. त्यामुळे लाभार्थ्यांमध्ये तीव्र संतापाची लाट आहे.

दिवठाणा गावाचे पुनर्रवसन अतिशय चुकीच्या ठिकाणी करण्यात आले आहे. पाटबंधारे विभागाच्या सहा. अभियंत्यांनी वरिष्ठ तसेच चुकीचे अहवाल सादर केले आहे. कागदोपत्री अहवाल आणि प्रत्यक्षात बरीच तफाव आहे. त्यामुळे पनर्रवसन झालेल्या ठिकाणाचे वरिष्ठ स्तरावरून स्थळ निरिक्षण व्हावे.- सुभाष वाकुडकर,माजी, सरपंच दिवठाणा.