शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

नोंदणी साडेचार हजारावर, आवक मात्र शुन्यावर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2019 15:01 IST

आतापर्यंत सोयाबीन व उदिडाची एक क्विंटलही आवक नाफेडकडे आली नाही.

- ब्रम्हानंद जाधव  लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: आधारभूत किंमतीनुसार नाफेडकडून शेतमालाची खरेदी करण्यासाठी जिल्ह्यातील ४ हजार ५२३ शेतकऱ्यांनी सोयाबीन व उडिदाची आॅनलाइन नोंदणी केली आहे. मात्र आतापर्यंत सोयाबीन व उदिडाची एक क्विंटलही आवक नाफेडकडे आली नाही. जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतमालासाठी नाफेडलाही प्रतीक्षा करावी लागत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.जिल्ह्यात नाफेडच्यावतीने शेतमालाची खरेदी केंद्र शासनाच्या आधारभुत दराने करण्यात येत आहे. या खरेदी केंद्रासाठी शेतकऱ्यांना सोयाबीन, उडीद व मुंग या शेत मालाची आॅनलाइन नोंदणी करणे बंधनकारक आहे. आतापर्यंत सोयाबीन व उडीद या शेतमालाची साडेचार हजार शेतकºयांनी नोंदणी केली. परंतू सोयाबीन व उडीद पिकालाना अतिवृष्टीचा फटका बसल्याने शेतमालाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अनेक शेतकºयांचे सोयाबीनचे पीक काळे पडले आहे. त्यामुळे काळे पडलेले सोयाबीन नाफेडकडे विक्री केल्या जाऊ शकत नाही. परिणामी सोयाबीन व उडीदाची आवक नाफेडकडे झालेली नाही. आतापर्यंत केवळ मूग या पिकाचीच खरेदी नाफेडकडून करण्यात आलेली आहे.मुगाची तीन हजार क्ंिवटल खरेदीजिल्ह्यात नाफेड अंतर्गत केवळ मूग खरेदी आतापर्यंत झालेली आहे. त्यातही आवक पाहिजे त्या प्रमाणात दिसून येत नाही. मूग शेतमाल विक्रीसाठी ६ हजार १९७ शेतकºयांनी आॅनलाइन नोंदणी केलेली आहे. त्यापैकी ३ हजार ६० क्विंटल मुगाची खरेदी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. परतीचा पाऊस येण्यापूर्वी मुगाची काढणी झाली होती. त्यामुळे तर काही ठिकाणी मूग काढणी सुरू असताना पावसाचा फटका बसला. परंतू मूगाच्या तुलनेत सोयाबीन व उडीद पिकाला पावसाचा मोठा बसला आहे. त्यामुळे नाफेडकडे आतापर्यंत सोयाबीन व उडीदाची आवक झालेली नाही.

टॅग्स :buldhanaबुलडाणाAPMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीFarmerशेतकरी