खामगाव, दि. २१- बुलडाणा जिल्ह्याचे मिनी मंत्रालय असलेल्या बुलडाणा जिल्हा परिषदेवर अध्यक्षपदी अपेक्षेप्रमाणे घाटाखालील जिल्हा परिषद सदस्यांचीच निवड झाली आहे. अध्यक्षपदी भाजपच्या उमा तायडे तर राष्ट्रवादीच्या मंगला रायपुरे यांच्या रूपाने उपाध्यक्षपदही घाटाखालील मलकापूर तालुक्याला मिळाले आहे. त्यामुळे सत्तेच्या ह्यलाल दिव्याह्णचा मान घाटाखालील तालुक्यालाच मिळाला आहे. विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात भाजपची सत्ता आली, त्यामुळे मलकापूर मतदार संघातील भाजपनेते आ. चैनसुख संचेती यांच्या मंत्रीमंडळ प्रवेशाची स्वप्नं या तालुक्यातील भाजप सर्मथकांना पडू लागली होती. अद्यापही त्यांना लाल दिव्याची प्रतीक्षा आहे. दरम्यान, आ. चैनसुख संचेती यांच्या रुपाने नव्हे, तर आता जिल्हा परिषद अध्यक्ष उमा तायडे यांच्या माध्यमातून मलकापूर तालुक्याला सत्तेचा लाल दिवा मिळाला आहे. त्यामुळे उमाताईंनी चैनुभाऊंच्या लाल दिव्याची उणीव काही अंशी भरून काढल्याची चर्चा मलकापूर मतदार संघात आता होत आहे. जिल्हा परिषदेवर सत्ता स्थापन करण्यासाठी भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबतच अपक्षांचीही साथ मिळाली. त्याचवेळी काँग्रेसने भाजपचा परंपरागत मित्र शिवसेनेशी हातमिळवणी केली. परस्पर विरोधी एकत्र आले तर मित्र दूर गेले, असेच चित्र जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडणुकीत दिसून आले. दरम्यान, जिल्ह्यात सर्वाधिक सदस्य घाटाखालील तालुक्यांमधून असल्याने, घाटाखालचा जिल्हा परिषद सदस्यच ह्यपरिवर्तनाह्णचा शिलेदार राहणार असल्याचे निवडणूक निकालाअंती स्पष्ट झाले होते. सत्तेच्या समान वाट्याच्या फॉर्म्युल्यानुसारही घाटाखालीच सत्तेच्या लाल दिव्याचे पारडे जड होते. दरम्यान, ग्रामीण भागातील विकास कामे आणि खामगाव मतदार संघातील ९ पैकी ९ उमेदवार विजयी केल्याबद्दल सत्तेचा लाल दिवा खामगाव तालुक्याला मिळणार, अशी अपेक्षा खामगाव मतदार संघातील जनतेकडून व्यक्त केली जात होती. शिवाय, ज्येष्ठता आणि ह्यपरिवर्तनाह्णच्या लाटेमुळेही खामगाव तालुक्याचे प्रतिनिधीत्व प्रबळ मानले जात होते. त्याचवेळी जिल्हा परिषद निवडणुकीत चमकदार कामगिरी केल्याबद्दल जळगाव जामोद तालुकाही सत्तेच्या लाल दिव्याच्या स्पर्धेत होता. सत्तेच्या लाल दिव्याची स्पर्धा जळगाव जामोद आणि खामगाव तालुक्यातच होती; मात्र मंगळवारी उशिरा रात्री घडलेल्या घडामोडीत मलकापूर तालुकाच ह्यबाजीगरह्ण ठरला. मलकापूर तालुक्याचे प्रतिनिधीत्व करणार्या आ. चैनसुख संचेती यांनी वेळेवर ह्यमुकद्दर का सिकंदरह्ण होत बाजी मारली आहे. तथापि, सत्तेतील पहिल्या टर्मचा वाटा मलकापूर तालुक्याला मिळाला असला तरी, घाटाखालील खामगाव, जळगाव जामोदसोबतच घाटावरील तालुक्यालाही सत्तेच्या लाल दिव्याचा मान मिळणार आहे, एवढे मात्र निश्चित!तीन नगराध्यक्ष पक्ष बदललेले नगरपालिकेत पाच पैकी तीन नगराध्यक्ष भाजपचे विजयी झाले; मात्र यापैकी चार नगराध्यक्ष हे अन्य पक्षातून भाजपमध्ये आलेले होते. चिखलीचे नगराध्यक्ष प्रिया बोंद्रे यांचे पती कुणाल बोंद्रे पूर्वी काँग्रेसमध्ये होते. त्यांनी ऐनवेळी पक्ष बदलला व भाजपमध्ये गेले आणि नगराध्यक्ष झाले. खामगावच्या अनिता डवरे यापूर्वी राष्ट्रवादीत होत्या. त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला व नगराध्यक्षपदी विराजमान झाल्या. देऊळगाव राजा सुनीता रामदास शिंदे यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होत्या. त्या बाजार समितीत राष्ट्रवादीच्या तिकिटावर संचालक होत्या. त्यांनी नगरपालिकेत भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढविली व विजयी झाल्या.तायडे यांच्या निवडीने चक्रावले निष्ठावंत जिल्ह्यात भाजपला २४ जागा मिळाल्या. यामध्ये खामगाव तालुक्यातील सर्वच तसेच जळगाव जामोद तालुक्यातही सर्वच जागा मिळाल्या. त्यामुळे कृषी मंत्री भाऊसाहेब फुंडकर यांच्या तालुक्यातील सदस्य जयश्री टिकार यांना अध्यक्षपद मिळेल, अशी चर्चा होती. सोमवार रात्रीपर्यंत टिकार यांचेच नाव घेतल्या जात होते. दुसरीकडे घाटावर असलेल्या चिखली तालुक्यातील उंद्री जि. प. सर्कलच्या श्वेता महाले यांची अध्यक्षपदी वर्णी लागेल, अशीही चर्चा होती; मात्र खामगाव, जळगाव जामोद व चिखली तालुका वगळता मलकापूर तालुक्यातील व त्यातही नुकतेच पक्षात आलेल्या नेत्याला अध्यक्षपद देण्यात आल्याने सर्वच निष्ठावंत कार्यकर्ते चक्रावले आहेत.
सत्तेचा लाल दिवा घाटाखालीच!
By admin | Updated: March 22, 2017 02:04 IST