शहरं
Join us  
Trending Stories
1
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
2
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
3
Nuwan Thushara, IPL 2024 MI vs KKR: 'पॉवर-प्ले'मध्ये कोलकाताची 'बॅटरी डाऊन'! तुषाराने घेतल्या ३ विकेट्स, हार्दिकनेही फोडला घाम
4
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
5
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
6
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
7
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
8
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
9
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास
10
पातूरच्या घाटात भीषण अपघात; सहा जण ठार, चार गंभीर जखमी!
11
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
12
ऑस्ट्रेलियाचा टीम इंडियाला धक्का; कसोटी क्रमवारीत अव्वल! भारताची दुसऱ्या स्थानी घसरण
13
संजय चव्हाण, विजय करंजकरांचे बंड; शांतीगिरी महाराज नाशिकमधून अपक्ष लढणार
14
शरद पवार यांच्या ताफ्यातील दोन वाहने धडकली
15
देशातील कर प्रणालीवर राजीव बजाज यांची टीका, सरकारकडे केली 'ही' मागणी...
16
पाकिस्तान भारताची कॉपी करायला गेला, चीनच्या मदतीनं लॉन्च केलं 'मून मिशन'; झाला 'खेला'!
17
'आम्ही तेथे राहुल गांधींविरोधात जिंकू शकणार नाही...'; भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचा टोमणा
18
सायकल बिल्डिंगखाली लावली म्हणून पित्रा-पुत्राने केली एकाची हत्या; गिरगावात धक्कादायक प्रकार
19
“उद्धव ठाकरे वीर सावरकरांचे नाव भाषणात घेण्याची हिंमत करु शकतात का?”; अमित शाहांचे आव्हान
20
'भारतावर संकट आले की, राहुल गांधी इटलीला पळून जातात', योगी आदित्यनाथांचा घणाघात

‘रिल’ पेक्षा ‘रियल’ हिरो प्रेरणादायी - मकरंद अनासपुरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2018 12:16 AM

नांदुरा : सर्वसामान्य तरुणवर्ग चित्रपटसृष्टीत काम करणार्‍या अभिनेत्यांपासून प्रेरणा घेतात मात्र ते सर्व कला जपत पैशासाठी काम करीत असतात तर आपल्या सभोवताली खडतर आयुष्य जगून आदर्श जपणारी ध्येयवेडी समाजासाठी झटणारी व्यक्तीमत्व अनेक असतात. असे रियल हिरो प्रेरणादायी असून त्यांचा आदर्श घ्यावा असे प्रतिपादन नाम फाऊंडेशनचे प्रमुख तथा मराठी सिने अभिनेता मकरंद अनासपुरे यांनी केले. ९ जानेवारी संध्याकाळी कोठारी विद्यालयात शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबीयांना आर्थिक मदत वितरणाच्या कार्यक्रमात बोलत होते. 

ठळक मुद्देशेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांना मदतीचे वितरण 

लोकमत न्यूज नेटवर्कनांदुरा : सर्वसामान्य तरुणवर्ग चित्रपटसृष्टीत काम करणार्‍या अभिनेत्यांपासून प्रेरणा घेतात मात्र ते सर्व कला जपत पैशासाठी काम करीत असतात तर आपल्या सभोवताली खडतर आयुष्य जगून आदर्श जपणारी ध्येयवेडी समाजासाठी झटणारी व्यक्तीमत्व अनेक असतात. असे रियल हिरो प्रेरणादायी असून त्यांचा आदर्श घ्यावा असे प्रतिपादन नाम फाऊंडेशनचे प्रमुख तथा मराठी सिने अभिनेता मकरंद अनासपुरे यांनी केले. ९ जानेवारी संध्याकाळी कोठारी विद्यालयात शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबीयांना आर्थिक मदत वितरणाच्या कार्यक्रमात बोलत होते. आमदार चैनसुख संचेती यांच्या वाढदिवसानिमित्त शहर व तालुका भाजपाच्यावतीने तालुक्यातील एकशे एक शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबीयांना आर्थिक मदतीच्या वितरणासाठी सिनेअभिनेता मकरंद अनासपुरे यांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मकरंद अनासपुरे यांचे शहरात आगमन होताच आमदार चैनसुख संचेती यांच्या सोबत त्यांनी कृषी उत्पन्न बाजार समिती द्वारा संचालित शेतकरी पुत्र अभ्यासिकेला भेट दिली व विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला. यावेळी सभापती बलदेवराव चोपडे, उपसभापती संजय फणसे व अभ्यासिकेचे प्रणेते राजेश गावंडे यांनी त्यांचे स्वागत केले व या उपक्रमाबाबत माहिती दिली. कार्यक्रमाचे आयोजन कोठारी विद्यालयात करण्यात आले होते. प्रस्तावना राम झांबरे महाराज यांनी केली. त्यांनी आमदार चैनसुख संचेती यांच्या मार्गदर्शनात सुरु असलेल्या विविध सामाजिक उपक्रमांची माहिती दिली. जि.प. अध्यक्षा उमाताई पाटील यांनी त्यांच्या मार्गदर्शनात आमदार चैनसुख संचेती यांच्या सारखे नेतृत्व लाभल्याने मतदारसंघाचा विकास झपाट्याने होत असल्याचे सांगितले. आमदार चैनसुख संचेती यांनी त्यांच्या मार्गदर्शनात राज्य सरकारने शेतकर्‍यांना दिलेली कर्जमाफी, शेतीमालाची हमीभावात सुरु असलेली खरेदी, जलयुक्त शिवार अभियान आदी योजना राज्य सरकार राबवित असून शेतकर्‍यांचे जिवनमान उंचविण्याचा प्रयत्न करीत असल्याचे सांगितले.  आत्मशक्ती फाऊंडेशनच्या दिनदर्शिकेचे लोकार्पण मकरंद अनासपुरे यांनी करुन शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांना आर्थिक मदतीचे वितरण केले. यावेळी नगराध्यक्षा रजनीताई जवरे, शिवचंद्र तायडे, पं.स. सभापती अर्चनाताई पाटील, सतिशचंद्र रोठे, भाजपा ता.अध्यक्ष शैलेष मिरगे, शहर अध्यक्ष सुधीर मुर्‍हेकर, भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष सचिन देशमुख आदींची प्रमुख उपस्थिती होती.आपल्या प्रमुख मार्गदर्शनात मकरंद अनासपुरे यांनी शेतकर्‍यांचे जिवनमान उंचविण्यासाठी प्रयत्न करण्याचे व शेतीमालाला हमीभाव व सिंचन सोयीसुविधा दिल्या तर शेतकर्‍यांचे जगने सुकर होईल. तसेच शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबीयांना रोजगारासाठी सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले. या कार्यक्रमाला शहर व तालुक्यातील नागरिकांची मोठी उपस्थिती होती. कोठारी विद्यालयाचे प्रांगण गर्दीने खचून भरले होते. कार्यक्रमाचे संचालन पत्रकार महेश पांडे यांनी केले. 

शेतीमालाला हमीभाव द्या!शेतकर्‍यांच्या सर्व समस्यांचे मुळ मिळत नसलेला हमीभाव, नैसर्गिक आपत्ती व अपुर्‍या सिंचन सोयी यामध्ये आहे. त्यामुळे शेतमालाला हमीभाव देवून इतर सोयी दिल्यास आत्महत्या थांबतील असा आशावाद मकरंद अनासपुरे यांनी व्यक्त केला.

शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबीयांसाठी एवढ कराशेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबीयांना मदत देतांना त्यांना व्यवसाय करता यावा याकरिता शिलाईमशीन आदी व्यवसायापुरक साहित्याचे वाटप केल्यास व्यवसायाच्या माध्यमातून या कुटुंबांना आर्थिक स्थैर्य येईल. त्यामुळे अशी मदत व त्याकरिता पुढकार घेण्याचे आवाहन सिनेअभिनेता मकरंद अनासपुरे यांनी केले.

टॅग्स :Makrand Anaspureमकरंद अनासपुरेbuldhanaबुलडाणा