शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

रेशनचा काळाबाजार कोट्यवधीच्या घरात 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2017 00:46 IST

रेशनच्या मालाचा काळाबाजार जिल्हय़ातील  सर्वच तालुक्यांमध्ये होत असून, या काळ्या बाजारात  कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत आहे. गोरगरिबांच्या  तोंडचा घास हिरावणारी मोठी लॉबी विदर्भात सक्रिय  असून, याचे धागेदोरे शोधून काढण्याचे मोठे आव्हान  पोलीस प्रशासनासमोर उभे ठाकले आहे. 

ठळक मुद्देजिल्हय़ात गरिबांच्या तोंडचा घास हिरावणारी मोठी  लॉबी!पोलीस प्रशासनासमोर मोठे आव्हान जिल्हय़ातील सर्वच तालुक्यांमध्ये शनच्या मालाचा  काळाबाजार 

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: रेशनच्या मालाचा काळाबाजार जिल्हय़ातील  सर्वच तालुक्यांमध्ये होत असून, या काळ्या बाजारात  कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत आहे. गोरगरिबांच्या  तोंडचा घास हिरावणारी मोठी लॉबी विदर्भात सक्रिय  असून, याचे धागेदोरे शोधून काढण्याचे मोठे आव्हान  पोलीस प्रशासनासमोर उभे ठाकले आहे. खामगाव शहर पोलीस स्टेशनच्यावतीने २0 ऑगस्ट  रोजी काळाबाजारात जाणारा रेशनचा तब्बल ६00  िक्वंटल तांदूळ १४ चाकी ट्रकसह पकडण्यात आला हो ता. या कारवाईमुळे रेशनचा काळाबाजार चव्हाट्यावर  आला. यामध्ये पकडला गेलेला तांदूळ वाहून नेणारा ट्रक  हा नांदुरा येथील ओम राठी यांच्या मालकीचा असून, तो  शासनाने द्वारपोच योजनेंतर्गत अधिग्रहित केलेला आहे.  त्यामुळे या ट्रकचा वापर खासगी वाहतुकीसाठी करता  येणे शक्य नाही; मात्र रेशनचा तांदूळ पोते बदलून  गोंदियाकडे नेण्यात येत होता. काळाबाजारात जाणारा  तांदूळ अगोदर नांदुरा येथे गोळा केला जाऊन नंतर तो  बाजारात नेला जात असल्याचे या कारवाईमध्ये  उघडकीस आले. याच दिवशी बुलडाण्यातही रेशनचा  तांदूळ पकडला गेला होता. यानंतर १ सप्टेंबरला  खामगावनजीकच्या वाडी येथे रेशन दुकानदार चांडक  यांच्या गोडावूनवर शहर पोलिसांनी छापा मारला असता  मोठय़ा प्रमाणात धान्यसाठा व बारदाण्यासह इतर ऐवज  आढळून आला. यावेळी तब्बल ३२ लाखाचा मुद्देमाल  जप्त करण्यात आला. यानंतरही जिल्हय़ात ठिकठिकाणी रेशनचा माल  काळाबाजारात नेताना पकडला गेला आहे. दोन मोठय़ा  कारवाया व इतर घटना पाहता रेशनचा काळाबाजार  जिल्हय़ात चांगलाच फोफावला असून, यामध्ये  महिन्याकाठी कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत  असल्याचे दिसून येते. जिल्हय़ातील रेशनच्या मालाची  एवढय़ा मोठय़ा प्रमाणात अफरातफर होत असताना  पुरवठा विभाग मात्र यापासून   अनभिज्ञ कसा काय राहू  शकतो हा कळीचा मुद्दा होऊ शकतो. पुरवठा  विभागाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांच्या आशीर्वादाने तर हा  काळाबाजार होत नाही ना अशी शंका उपस्थित  झाल्याशिवाय राहत नाही. जिल्हय़ातील रेशनचा तांदूळ  हा गोंदिया, भंडारा जिल्हय़ातील राइस मिलमध्ये जातो व  तेथे पॉलिशिंग करून तोच बाजारात दामदुप्पट भावाने  विकला जातो, अशी माहिती पोलिसांना मिळालेली आहे.  तर या रॅकेटमध्ये अनेक बड्या व्यापार्‍यांचा समावेश  असून, त्यांचा समावेश आरोपींमध्ये केला जाण्याची श क्यता पोलिसांनी याआधीच वर्तविली आहे; परंतु १५  दिवस उलटूनही अद्याप त्या दृष्टीने कोणतीही प्रगती  झालेली दिसत नाही.

पालकमंत्र्यांच्या प्रतिष्ठेचा प्रश्नराज्याचे कृषिमंत्री तथा पालकमंत्री ना. भाऊसाहेब  फुंडकर यांच्या जिल्हय़ात  रेशनचा काळाबाजार  चव्हाट्यावर आला. त्यातही त्यांचे होमटाउन  खामगावलगतच्या शहर व गावांमध्ये या काळ्या  बाजाराची उगमस्थाने दिसत आहेत. त्यामुळे  त्यांच्यासाठी सुद्धा हा चिंतेचा विषय ठरला आहे.  गोरगरिबांच्या तोंडचा घास हिरावणार्‍या या  रेशनमाफियांच्या मुसक्या आवळल्या जाणे फुंडकरांच्या  राजकीय प्रतिष्ठेकरिता आवश्यक बनलेले आहे.  याकरिता पालकमंत्र्यांनी संबंधितांना योग्य ते निर्देश द्यावे त, अशी नागरिकांची अपेक्षा आहे.