धाड(बुलडाणा), दि. २९- येथून जवळच असलेल्या ग्राम सातगाव म्ह. येथील १९ वर्षीय युवतीवर बलात्कार करणार्या आरोपीविरुद्ध २९ मार्च रोजी धाड पोलिसांत गुन्हा दाखल झाला असून, पोलीस आरोपींच्या शोधार्थ रवाना झाले आहेत. धाडपासून अवघ्या ४ कि.मी. अंतरावर असणार्या सातगाव म्ह. येथील १९ वर्षीय युवतीच्या नात्यात असणारा आरोपी आकाश नवृत्ती हिवाळे याने पीडित मुलीला घरी बोलावून तिच्यावर बलात्कार केला. या घटनेची कुठेही वाच्यता केल्यास ठार करण्याची धमकी दिली. हय़ा घटनेने भेदरलेल्या मुलीने ही बाब कुणालाही सांगितली नाही. याचा फायदा घेत आरोपीने पीडित मुलीस औरंगाबाद येथे घेऊन गेला व तिचेवर वेळोवेळी बलात्कार केला. दरम्यान, आरोपी हा कामास बाहेर गेल्याचे पाहून तिने आपल्या नातलगांना फोन करुन माहिती दिली. नातेवाईक तिला घरी घेऊन आले आणि धाड पोलीस ठाण्यामध्ये मुलीने तक्रार नोंदवली. यावरुन पोलिसांनी आरोपी आकाश हिवाळे विरुद्ध कलम ३७६, ५0६ नुसार गुन्हा नोंदवला. पोलिसांचे पथक आरोपीचे शोधार्थ औरंगाबादकडे रवाना झाले आहे.
युवतीवर बलात्कार; आरोपी फरार
By admin | Updated: March 30, 2017 02:30 IST