शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

चारबन येथे रानभाजी महोत्सव थाटात 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2021 20:50 IST

Ranbhaji Festival at Charban : जळगाव जामोद तालुक्यातील चारबन येथे जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.

- नानासाहेब कांडलकरजळगाव जामोद : जागतिक आदिवासी दिनानिमित्त जळगाव जामोद तालुक्यातील चारबन येथे जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमास जिल्ह्याचे जिल्हाधिकारी एस.राममूर्ती तसेच जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नाईक  यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमास उपविभाग जळगाव जामोदचे उपविभागीय अधिकारी वैशाली देवकर,तहसीलदार सूर्यवंशी, उपविभागीय कृषी अधिकारी खामगाव दीपक पटेल,तालुका कृषी अधिकारी धीरज वाकोडे,कृषी विज्ञान केंद्र जळगाव जामोद वैज्ञानिक विकास जाधव साहेब उपस्थित होते.जळगाव जामोद पंचायत समितीचे सभापती रामेश्वर राऊत हे सुद्धा उपस्थित होते.कृषी उपसंचालक विजय बेतीवार व कृषी विकास अधिकारी महाबळे यांची उपस्थिती होती.      प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले जिल्ह्याचे जिल्हाधिकारी एस राममूर्ती यांनी येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये वृक्षारोपण करून आदिवासी मुलींसोबत आदिवासी लोकनृत्य केले. जिल्हाधिकारी साहेबांचा वाढदिवस त्यांनी आदिवासी मुलांसोबत साजरा केलानंतर ते कृषि विभागामार्फत आयोजीत जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सव चारबन तिथे येऊन कार्यक्रमाचे उद्घाटन केले.रानभाजी महोत्सवास विविध 18 प्रकारच्या रानभाज्यांचे प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.तेथे त्यांनी सर्व भाज्यांची ओळख करून घेतली.तसेच आदिवासी महिलांनी बनविलेले 23 प्रकारच्या रेसिपी पाककृतिची पाहणी केली. कृषि विभागामार्फत आयोजीत रानभाज्या पाक कृती स्पर्धा घेण्यात आली होती.त्यात 14 आदिवासी महिलानी सहभाग घेतला.त्याची पाहणी सुद्धा साहेबांनी केली नंतर सर्व पाहुण्यांचे सत्कार समारंभ घेण्यात आला.अध्यक्ष म्हणून कार्यक्रमास सुलभा रवींद्र वाघमारे सरपंच ग्रामपंचायत उमापुर म्हणून लाभल्या तसेच प्रमुख अतिथी म्हणून जिल्ह्याचे जिल्हाधिकारी एस राममूर्ति लाभले होते तसेच जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी माननीय श्री  नरेंद्र नाईक,उपविभागीय अधिकारी देवकर, तहसीलदार सूर्यवंशी,कृषी विज्ञान केंद्र वरिष्ठ वैज्ञानिक जाधव साहेब उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रजनी साठे कृषी सेवक  यांनी केले प्रमुख पाहुण्यांचे स्वागत माननीय नाईक यांनी केले. कृषी विज्ञान केंद्राचे उमाळे सर यांनी रानभाज्यांचे महत्त्व समजून सांगितले.रानभाज्यांचे आदिवासी भगिनींनी बनवून आणलेल्या रेसिपीचे स्पर्धा घेण्यात आली.त्या स्पर्धेचे निवड झालेल्या प्रथम तीन आदिवासी महिलांना प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.                आदिवासी महिलांनी आदिवासी गीतांचे सादरीकरण केले.कार्यक्रमाची प्रस्तावना नाईक यांनी केली व कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन संदीप निमकर्डे मंडळ कृषी अधिकारी यांनी केले. कार्यक्रमास तालुक्यातील सर्व कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक,समुय सहाय्यक व आदिवासी बांधव उपस्थित होते.यानंतर माननीय जिल्हाधिकारी व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी तालुका कृषी अधिकारी कार्यालय अंतर्गत गारपेठ येथील भंगी सावकऱ्या ससत्या गट नंबर 11 यांच्या शेतातील मग्रारोहयो सन्त्रा फळबाग लागवडची पाहणी केली.तेथें फरोमोन ट्रप पाहणी केली. कपाशीवरिल किड रोगविषयी त्यानी जाणुन घेतले. त्यानंतर जिल्हाधिकारी यांनी ग्रामपंचायत उमापूर येथे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प ग्रामपंचायत उमापूर येथे भेट दिली व समितीच्या सदस्य सोबत चर्चा केली तसेच जमीन आरोग्य पत्रिकाचे फलक बाबत माहिती घेतली.            यानंतर  जिल्हाधिकारी व उपस्थित सर्व कर्मचारी यांनी कृषी विज्ञान केंद्र जळगाव जामोद यांनी ड्रोन  द्वारे फवारणी  करण्याचे प्रात्यक्षिक दाखविले.त्यानंतर अधिकारी यांनी डॉक्टर पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशन अंतर्गत महात्मा फुले स्वयंसहायता जैविक शेती गट पाच भेट दिली गटाचे अध्यक्ष गजानन कोथळकर यांनी त्यांनी केलेल्या सर्व जैविक घटकांचे माहिती सर्व कर्मचारी अधिकाऱ्यांना दिली तिथेच सेंद्रिय गटांच्या विविध निविष्ठांची पाहणी माननीय जिल्हाधिकारी यांनी केली व त्याबाबत माहिती घेतली.यांत्रिकीकरण घटकांतर्गत ट्रॅक्टरची पाहणी सुद्धा करण्यात आली.

टॅग्स :Jalgaon Jamodजळगाव जामोदbuldhanaबुलडाणा