शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील एक लाखावर शिधापत्रिका बोगस!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2017 00:25 IST

खामगाव: बुलडाणा जिल्ह्यात वितरित करण्यात आलेल्या पाच लाख ५४ हजार ४४५ शिधापत्रिकांपैकी एक लाखावर शिधापत्रिका बोगस असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. सन २00५ ते २0११ या कालावधीत जिल्ह्यातील ८५ हजार शिधापत्रिका बोगस ठरल्या होत्या.

ठळक मुद्देपुरवठा विभागाचे कानावर हात

खामगाव: बुलडाणा जिल्ह्यात वितरित करण्यात आलेल्या पाच लाख ५४ हजार ४४५ शिधापत्रिकांपैकी एक लाखावर शिधापत्रिका बोगस असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. सन २00५ ते २0११ या कालावधीत जिल्ह्यातील ८५ हजार शिधापत्रिका बोगस ठरल्या होत्या. त्यानंतर सहा वर्षांमध्ये यामध्ये तब्बल १६ हजार बोगस शिधापत्रिकांची वाढ झाल्याची खात्रीलायक माहिती आहे. बोगस शिधापत्रिकांचा शोध घेण्यासाठी सन २00५ ते २0११ या कालावधीत तत्कालीन राज्य शासनाच्यावतीने राज्यभर विशेष शोध मोहीम राबवली होती. त्यावेळी मोठय़ा प्रमाणात बोगस शिधापत्रिका आढळून आल्या, तर बुलडाणा जिल्ह्यातील ८५  हजार ३७५ शिधापत्रिका बोगस आढळल्या होत्या. १६ टक्के त्याचे प्रमाण होते. गत सहा वर्षांंत  शासनाकडून आणखी उपाययोजना करण्यात आल्या. परिणामी, बोगस शिधापत्रिकांची संख्या वाढली. हा आकडा आता लाखाच्या वर पोहोचल्याचे विश्‍वसनीय सूत्रांचे म्हणणे आहे.गेल्या हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात एक कोटीच्यावर शिधापत्रिका बोगस असल्याचे जाहीर केले होते. बापट यांनी आधार सिडींगमुळे बोगस शिधापत्रिका शोधल्याने ३६ हजार मेट्रिक टन धान्याची बचत झाल्याचा खुलासा केला होता. याबाबत पुरवठा विभागाच्या अधिकार्‍यांशी संपर्क साधला असता, त्यांनी अधिक माहिती देण्यास नकार देत, कानावर हात ठेवले.