मेहकर : अलीकडच्या काळामध्ये सर्वच ठिकाणी पावसाचे प्रमाण कमी अधिक होतआहे. दरवर्षी निसर्गाचा समतोल बिघडत चालला आहे. वृक्षांच्या कत्तलीचेप्रमाण वाढत असल्याने याचा परिणाम निसर्गावर होत आहे. त्यामुळेप्रत्येकाने एकतरी वृक्ष लावून त्या वृक्षाचे आपल्या मुलाप्रमाणे संगोपनकरावे, असे प्रतिपादन अप्पर जिल्हा पोलिस अधिक्षक संदीप डोईफोडे यांनीकेले.२१ जून रोजी स्थानिक पोलिस स्टेशनच्या आवारामध्ये वृक्षारोपणाचाकार्यक्रम घेण्यात आला. यावेळी डोईफोडे बोलत होते. या कार्यक्रमालाउपविभागीय पोलिस अधिकारी रामेश्वर वैंजणे, ठाणेदार मोतीचंद राठोड, पंढरीजाधव, समिर शेख, शरद गिरी, देविचंद चव्हाण, उमेश घुगे आदींची उपस्थितीहोती. शासन दरवर्षी वृक्ष लागवडीसाठी विविध उपक्रम राबवित आहे. याउपक्रमात सर्वांनी सहभाग घेऊन वृक्ष लावण्या संदर्भात नागरिकांमध्येजनजागृती केली पाहिजे. केवळ उपक्रम न राबविता प्रत्येकाने एक वृक्ष लावूनत्या वृक्षाचे संगोपन केले पाहिजे, असेही डोईफोडे यांनी सांगितले.(तालुका प्रतिनिधी)
वृक्षांचे मुलाप्रमाणे संगोपन करा - डोईफोडे
By admin | Updated: June 23, 2017 16:06 IST