शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

राजूर घाट-हरमोड धरण नालाखोलीकरणास प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2019 18:13 IST

बुलडाणा: शहरा लगतच्या राजूर घाटातील टेकड्यांचे वाहून जाणारे पाणी मुर्ती-हरमोड पाझर तलावात पोहोचविण्यासाठी परिसरातील नाला खोलीकरणाच्या कामास प्रारंभ करण्यात आला आहे.

बुलडाणा: शहरा लगतच्या राजूर घाटातील टेकड्यांचे वाहून जाणारे पाणी मुर्ती-हरमोड पाझर तलावात पोहोचविण्यासाठी परिसरातील नाला खोलीकरणाच्या कामास प्रारंभ करण्यात आला आहे. दरम्यान, हे काम पूर्णत्वास गेल्यास भविष्यात या भागात सिंचनाच्या सुविधेसह पिण्याच्या पाण्याची उपलब्धता होईल, असे मत माजी आ. विजयरा शिंदे यांनी व्यक्त केले.या कामाच्या प्रारंभ प्रसंगी टाकळीचे सरपंच तुळशीराम सपकाळ, इखरचे व्यवस्थापक प्रवीण वरकडे, माजी सभापती तेजराव पाटील, महादेव शिराळ प्रामुख्याने उपस्थित होते. मुर्ती फाट्याच्या बाजूला असलेला हरमोड हा सिंचन विभागाचा पाझर तलाव असून पर्जन्यमान कमी झाल्याने गेल्या २५ वर्षात हा तलाव भरलेला नाही. राजूर घाटातील राजूर, मोहेंगाव गावाच्या पूर्वेकडील टेकड्यांवरील पावसाचे वाहून जाणारे पाणी हरमोड धरणात सोडल्यास धरण भरले व परिसरातील शेतकर्यांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध होईल अशी परिसरातील राजूर, मुर्ती,  वाघजाळ, टाकळी, वारूळी, मोहेगाव सह परिसरातील ग्रामस्थानी केली होती. गेल्या वर्षीपासून ही मागणी पुढे येत आहे.  त्यासंदर्भाने माजी आमदार विजयराज शिंदे जिल्हा परिषदेचे तत्कालीन सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता काळवाघे यांची भेट घेतली होती. त्यानुसार या कामाचे अंदाजपत्रकही बनविण्यात आले होते. आता बीजेएसने जेसीबीसह अन्य यंत्रसामुग्री पुरवली असून शासन त्यासाठी इंधन पुरवठा करणार आहे. त्यानुषंगाने हे काम आता मार्गी लागले असून त्याच्या कामास गुरूवार पासून प्रारंभ झाला.यावेळी समाधान लोखंडे, विवेक वर्हाडे, माधव शिराळ, गजानन पाटील, कैलास पाटील, पंडितराव शिवणेकर, सचिन शेळके, नारायण काटे, ज्ञानेश्वर खंडागळे, सुभाषसिंग राजपूत, ओमसिंग राजपूत, चंद्रकांत काटकर यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते.

टॅग्स :buldhanaबुलडाणा