शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

आयात धोरणाचा तूर उत्पादकांना फटका- राजू शेट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2020 16:33 IST

केंद्र सरकारच्या चुकीच्या कडधान्य आयात धोरणामुळे शेतकरी त्रस्त आहेत. त्यावर मुख्यमंत्र्यांनी हरकत नोंदवावी, असे शेट्टींनी स्पष्ट केले.

बुलडाणा: केंद्र सरकारच्या आयात धोरणाचा तूर उत्पादक शेतकऱ्यांना फटका बसला असून या विरोधात राज्य शासनाने अर्थात मुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकारकडे जोरदार हरकत नोंदवावी. हमी भावापेक्षा कमी भाव शेतकऱ्यांना बाजारात मिळत आहे. त्याचा फरक थेट शेतकºयांच्या खात्यात जमा करावा, अशी मागणी स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केली.स्वाभीमानी शेतकरी संघटनेची पुनर्रचना आणि पदाधिकारी निवडीच्या अनुषंगाने आठ फेब्रुवारी रोजी बुलडाण्यात बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी रविकांत तुपकर, दामू अण्णा इंगोले, बबन चेके, घनश्याम चौधरी, डॉ. ज्ञानेश्वर टाले, राणा चंदन, नंदीनी कल्याणकर उपस्थित होते. तूरीचा हमी भाव व बाजार भावात जवळपास १,५०० रुपयांचा फरक आहे. शेतकºयाला सरासरी सात क्विंटल तुरीचे उत्पादन होते. त्यानुषंगाने ही फरकाची रक्कम शेतकºयाच्या खात्यात जमा केली जावी, असे ते म्हणाले. केंद्र सरकारच्या चुकीच्या कडधान्य आयात धोरणामुळे शेतकरी त्रस्त आहेत. त्यावर मुख्यमंत्र्यांनी हरकत नोंदवावी, असे शेट्टींनी स्पष्ट केले. संघटनात्मक फेरबदलाचीही त्यांनी माहिती दिली. शिर्डी येथे २२ फेब्रुवारी रोजी संघटनेची बैठक होत असून त्यात राज्य कार्यकारीणी निवडण्यात येईल, असे ते म्हणाले. प्रारंभी रविकांत तुपकर यांनी बैठकीच्या आयोजनामागील भूमिका विषद केली. बैठकीत घाटावरील स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष म्हणून डॉ. ज्ञानेश्वर टाले तर स्वाभीमानीचे जिल्हाध्यक्ष म्हणून बबनराव चेके, अल्पसंख्यांक सेलचे जिल्हाध्यक्ष म्हणून शेख रफीक शे. करीम, जिल्हा विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष म्हणून पवनकुमार यांची निवड करण्यात आली. घाटाखालील संघटना अध्यक्ष म्हणून श्याम अवथळे, युवा आघाडी जिल्हाध्यक्ष म्हणून अनंता मानकर यांची निवड करण्यात आली. तर भगवान मोरे यांची राज्य कार्यकारीणीवर वर्णी लागणार असल्याचे ते म्हणाले.

टॅग्स :Raju Shettyराजू शेट्टीbuldhanaबुलडाणा