शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
4
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
5
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
6
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
7
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
8
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
9
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
10
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
11
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
12
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
13
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
14
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
15
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
16
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
17
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
18
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
19
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
20
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

स्वातंत्र्यप्राप्तीनंतरही राजपूत समाज न्यायाच्या अपेक्षेत - सानंदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2017 22:53 IST

देशासाठी शहीद होणारा समाज म्हणून राजपूत समाजाची  जगात ओळख आहे. राज्य, धर्म  वाचविणारा हा क्षत्रिय समाज  स्वातंत्र्यानंतरही वंचित आहे. शासनाने या  समाजाच्या त्यागाचा,  बलिदानाचा सन्मान करणे जरुरीचे असून, समाजाचा योग्य सन्मान  करून राजपूत समाजाला आरक्षण द्यावे, अशी मागणी माजी  आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांनी कोलारा येथे आयोजित  समस्त राजपूत समाजबांधवांच्या भव्य मेळाव्यात केली.

ठळक मुद्देकोलारा येथे पार पडला समस्त राजपूत समाजबांधवांचा मेळावा आरक्षणासाठी समाजाला सर्वोतोपरी सहकार्य करणार 

लोकमत न्यूज नेटवर्कचिखली: देशासाठी शहीद होणारा समाज म्हणून राजपूत समाजाची  जगात ओळख आहे. राज्य, धर्म  वाचविणारा हा क्षत्रिय समाज  स्वातंत्र्यानंतरही वंचित आहे. शासनाने या  समाजाच्या त्यागाचा,  बलिदानाचा सन्मान करणे जरुरीचे असून, समाजाचा योग्य सन्मान  करून राजपूत समाजाला आरक्षण द्यावे, अशी मागणी माजी  आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांनी कोलारा येथे आयोजित  समस्त राजपूत समाजबांधवांच्या भव्य मेळाव्यात केली.तालुक्यातील कोलारा येथे २७ ऑगस्ट रोजी समस्त राजपूत  समाजबांधवांचा भव्य मेळावा o्री सिद्धेश्‍वर महाराज संस्थानमध्ये  आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याच्या अध्यक्षस् थानावरून राणा दिलीपकुमार सानंदा बोलत होते. यावेळी समजाचे  ज्येष्ठ नेते मुख्त्यारसिंग राजपूत, महाराणा प्रताप पुतळा समितीचे  अध्यक्ष डॉ. प्रतापसिंग राजपूत, राजपूत महासंघाचे संस्थापक  सुभाषसिंह राजपूत, शंकरराव सोळंकी, साहेबराव सोळंकी, बाजार  समितीचे उपसभापती ज्ञानेश्‍वर सुरूशे, जि.प. सदस्य शरद हाडे,  पं.स. सदस्य मनीषा सपकाळ, अशोक सुरडकर, डॉ. प्रताप परिहार,  राम जाधव, संध्या राजपूत, योगेंद्र कटारिया, पंकजसिंह ठाकूर,  भारती शिसोदिया, जितेंद्र सूर्यवंशी, अजयसिंग सैगर, संजयसिंह  नाईक, संतोष पवार, डॉ. संजयसिंह कच्छवे, राजेंद्रसिंह राजपूत,  योगेंद्र राजपूत, सोनाली ठाकूर, बाबा ठाकूर, सुखदेवसिंह राजपूत,  आनंद ठोके यांच्यासह अ.भा. क्षत्रिय महासभा, महाराणा ब्रिगेड,  महाराणा क्रांती दल, राजपूत महासंघ, राजपूत युवा मंच आदी  विविध संघटनांचे पदाधिकारी होते. यावेळी पुढे बोलताना राणा  दिलीपकुमार सानंदा म्हणाले की, आमच्या पूर्वजांनी या मातीसाठी  व भूमीसाठी रक्त सांडले आहे. राज्याच्या लोकसंख्येच्या तुलनेत ९  टक्के राजपूत समाज आहे. असे असताना या राज्यात आजही न्याय  मिळत नसल्याची खंत व्यक्त करीत संकटाला संधी समजून काम  करू, तरच वास्तववादी राजपूत निर्माण होतील. आरक्षणाविनाही  राजपूत समाजाचे अनेक तरुण मोठय़ा हुद्यावर आहेत. जर आरक्षण  मिळाले तर समाजातील विद्यार्थ्यांना अपेक्षित क्षेत्रात चांगले स्थान  मिळविता येईल, असा आशावाद व्यक्त करीत लवकर ना. रावळ  यांच्या माध्यमातून जिल्हाधिकारी यांच्याकडे बैठक लावणार  असून, आरक्षणासाठी समाजाला सर्वोतोपरी सहकार्य करणार  असल्याचेही सानंदा यांनी आर्वजून सांगितले. यावेळी बोलताना डॉ. संजयसिंग कच्छवे यांनी राजपूत समाज हा  सर्वधर्म समभाव जपत असून, एकमेकांना मदत करणारा समाज  असल्याचे स्पष्ट करीत समाजाच्या आरक्षणासंदर्भातील जाचक  अटी काढण्यात येऊन भामटा हा शब्द न लावता सरसकट आरक्षण  मिळावे, अशी मागणी केली. राजपूत समाजाच्या जातीच्या दा खल्याचा प्रश्न जटिल बनला असून, तो सुकर करण्यासाठी  शासनाने या बाबीकडे गांभीर्याने लक्ष घालावे, अशी अपेक्षा  आरक्षण महामोर्चाचे अजयसिंग सेंगर यांनी व्यक्त केली. तर डॉ. प्र तापसिंह राजपूत यांनी समाजाच्यावतीने सरकारसोबत  आरक्षणासंदर्भाने कायदेशीर लढा सुरू असल्याचे सांगून राजपूत  भामटा, भामटी, परदेशी राजपूत या सर्व पोटजाती एकच आहेत.  तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार, मनोहर जोशी यांच्या  कार्यकाळामध्ये  समाजाचे अनेक प्रश्न मार्गी लागले; परंतु  आरक्षणाचा प्रश्न इंग्रजकालीन वसाहतीच्या नोंदी सोलापूर आणि  पुणे जिल्हय़ातच आढळल्या; मात्र इतर जिल्हय़ात राजपूत  समाजाच्या अस्तित्वाच्या नोंदी नसणे ही चूक प्रशासनाची आहे.  त्याची शिक्षा समाजाला देण्यात येऊ नये व रक्ताचे नाते असल्यास  ब्लड रिलेशननुसार बापाला असेल तर मुलाला व्हॅलीडीटीची गरज  पडू नये व सरसकट आरक्षण देण्यात यावे, अशी मागणी डॉ. राजपू त यांनी केली. -