शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

सर्वच पक्षांनी आरोग्याकडे दुर्लक्ष केल्याची खंत- राजेश टाेपे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 12:47 IST

Rajesh Tope : आतापर्यंत सत्तेत असलेल्या सर्वच पक्षांनी कमालीचे दुर्लक्ष केले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : समाजाची अत्यावश्यक गरज असलेल्या आरोग्य सेवेकडे आतापर्यंत सत्तेत असलेल्या सर्वच पक्षांनी कमालीचे दुर्लक्ष केले आहे. ही बाब कोरोना विषाणू संसर्गाने अधोरेखित केली. त्यामुळेच आतापर्यंत अर्थसंकल्पातील केवळ एक टक्का खर्च होणारा निधी पाच टक्क्यापर्यंत वाढवण्याचा प्रयत्न केला जात आहे. आरोग्य यंत्रणा सुदृढ केली जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या शासकीय रूग्णालयांमध्ये सीटी स्कँन, एमआरआय युनिटची सुविधा दिली जात आहे, असे राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री राजेश टोपे ायांनी येथे सांगितले.खामगाव शहरातील सिल्व्हरसिटी हाँस्पिटलमध्ये खामगाव सीटी स्कँन व एमआरआय रिसर्च सेंटरच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.यावेळी आमदार अँड. आकाश फुंडकर, माजी आमदार दिलिपकुमार सानंदा, नगराध्यक्ष अनिता डवरे यांच्यासह चेअरमन डाँ. भगतसिंग राजपुत, डाँ. निलेश टिबडेवाल, डाँ. गणेश महाले यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. यावेळी महात्मा फुले जनआरोग्य योजना सिल्व्हरसिटी रूग्णालयात सुरू व्हावी, यासाठी आपला प्रयत्न राहिल, असेही ना. टोपे यांनी उपस्थितांना आश्वासन दिले.पुढील काळात तालुक्याच्या ठिकाणी गरिब रूग्णांना सीटीस्कँन, एमआरआय, डायलिसिस सुविधा मोफत दिल्या जाणार आहेत. सोबतच सद्यस्थितीत राज्यातील दहा जिल्ह्यांमध्ये पथदर्शी प्रकल्प राबवला जात आहे. त्यामध्ये इसीजी तपासणी केलेल्या रूग्णावर त्याचवेळी उपचार सुरू केले जात आहेत. तसेच पुढील सेवेसाठी संदर्भ दिला जात आहे. येत्या काही दिवसात २६ जिल्ह्यांमध्येही हा उपक्रम सुरू होणार आहे, अशी माहिती ना. टोपे यांनी दिली. 

आरोग्यविम्यावर १७०० कोटींचा खर्चविशेष म्हणजे, महात्मा फुले जनआरोग्य योजनेसाठी विमा कंपनीला दरवर्षी १७०० कोटी रूपये दिले जातात. त्याचा विनाखर्चाचा लाभ केवळ शिधापत्रिकेवर गरिबांसह सर्वांनाच होत आहे. शासनाच्या अनेक समाजोपयोगी योजना सर्वांपर्यंत पोहचाव्या, यासाठी यंत्रणेतील संबंधितांनी दक्ष राहून त्याचा लाभ द्यावा, अशा सूचनाही त्यांनी केल्या.

शंभर टक्के जागा भरणारआरोग्य विभागात वाँचमनपासून सुपर स्पेशालिस्ट डाँक्टरपर्यंतची सर्व पदे भरली जाणार आहेत. त्यासाठी भरती प्रक्रीया सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. खामगाव रूग्णालयात खाटांची संख्या वाढवण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे त्यांनी जिल्हा शल्य चिकित्सकांना सांगितले.

टॅग्स :Rajesh Topeराजेश टोपेkhamgaonखामगाव